शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

येत्या काही दिवसांत कोल्हापुरात राजकीय भूकंप : राजेश क्षीरसागर

By संदीप आडनाईक | Updated: August 25, 2024 22:51 IST

जिल्ह्यातील मोठे नेते शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेणार

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : येत्या काही दिवसांत कोल्हापुरात राजकीय भूकंप होणार असल्याचा गौप्यस्फोट राज्य कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी रविवारी केला. जिल्ह्यातील मोठे नेते आगामी काळात शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतील. आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातून शिवसेनेचे सहा आमदार निवडून आणणार, असा विश्वासही राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

क्षीरसागर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एकसंघपणे काम करत आहेत. राज्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी शिवसेनेच्या मतांची टक्केवारी वाढलेली आहे. कोल्हापुरचा विचार करता राजघराण्याविषयी कोल्हापूरवासियांचे असलेले प्रेम हेच पराभवाचे प्रमुख कारण ठरले आहे. परंतु, पराभवाने खचून न जाता शिवसेना कोल्हापूर जिल्ह्यात एकसंघपणे काम करत आहे. शिवसेनेचे खासदार, माजी खासदार, विद्यमान आमदार, माजी आमदार, तिन्ही जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख सर्वजण एकजुटीने काम करत आहोत. त्यामुळे शिवसेनेमध्ये सामील होण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत, असेही ते म्हणाले.