शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

साठ सदस्यांना राजकीय विश्रांती

By admin | Updated: October 6, 2016 01:07 IST

जिल्हा परिषदेचे आरक्षण : विमल पाटील, खोत, ‘ए. वाय., धैर्यशील, मादनाईक यांचे देव उठले; आपटे, अमर पाटील, पेरीडकर, रेडेकर, के. एस. चौगुलेंना संधी

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या गटासाठी बुधवारी काढण्यात आलेल्या आरक्षणाचा झटका जिल्ह्यातील दिग्गजांना बसला. विद्यमान अध्यक्षा विमल पाटील, उपाध्यक्ष शशिकांत खोत, ए. वाय. पाटील, धैर्यशील माने, अप्पी पाटील, हिंदुराव चौगले, अर्जुन आबिटकर, अरुण इंगवले, शहाजी पाटील, राहुल देसाई, अनिल मादनाईक या दिग्गजांचे मतदारसंघ आरक्षित झाल्याने त्यांचे दसऱ्याआधीच देव उठले आहेत. उमेश आपटे, अमर पाटील, सर्जेराव पाटील-पेरीडकर, अंजना रेडेकर, के. एस. चौगुले, अविनाश पाटील यांचा परतण्याचा मार्ग मोकळा झाला. जाहीर झालेल्या आरक्षणाचा विचार केल्यास मावळत्या सभागृहातील ६९ पैकी तब्बल ६० सदस्यांना घरी बसावे लागेल, असे चित्र पुढे आले आहे.जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले असल्याने अनेकांनी जोरदार तयारी सुरू केली होती; पण बुधवारी जाहीर झालेल्या आरक्षणामुळे अनेकांच्या दांड्या निवडणुकीआधीच उडाल्या. मतदारसंघ राखीव झाल्याने अनेकांचे मनसुबे उधळले आहेत. तालुकानिहाय आरक्षण व दिग्गजांच्या झालेल्या कोंडीचा आढावा घेतला तर सोयीपेक्षा गैरसोयच अधिक झाल्याचे स्पष्ट होते. करवीर तालुका : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील यांचा सांगरूळ मतदारसंघ अनुसूचित जाती, तर उपाध्यक्ष शशिकांत खोत यांचा उजळाईवाडी मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने दोघांनाही घरी बसावे लागणार आहे. हे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. राधानगरी : विद्यमान सदस्या दीपा पाटील यांचा राशिवडे बुद्रुक हा खुला झाल्याने विनय पाटील यांच्यासह अविनाश पाटील यांना संधी मिळू शकते. कौलव, कसबा वाळवे, सरवडे मतदारसंघ इतर मागासवर्गीयसाठी आरक्षित झाल्याने दीपक कलिकते, अरुण डोंगळे, हिंदुराव चौगले, विजयसिंह मोरे, ए. वाय. पाटील, आदींची पंचाईत झाली आहे. राधानगरी सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने शिक्षण सभापती अभिजित तायशेटे यांना घरी बसावे लागणार आहे. भुदरगड : गारगोटी, पिंपळगाव, कडगाव हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने प्रा. अर्जुन आबिटकर, राहुल देसाई यांचे परतण्याचे मार्ग बंद झाले आहेत. कडगाव मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने विद्यमान सदस्या सुनीता धनाजी देसाई यांना पुन्हा संधी मिळू शकते. आकुर्डे खुला राहिल्याने येथून भाजपचे तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील, प्रदीप पाटील यांना संधी आहे. आजरा : कोळिंद्रे मतदारसंघ गेल्या वेळेला ‘इतर मागासवर्गीय’साठी आरक्षित होता. यावेळेला तो सर्वसाधारण महिला झाल्याने येथून महिला कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अंजना रेडेकर यांना संधी मिळू शकते. आजरा व उत्तूर दोन्ही मतदारसंघ पुन्हा खुले झाल्याने उमेश आपटे, वसंतराव धुरे व उदय देसाई, बाबूराव कुंभार, विलास नाईक हे शड्डू ठोकू शकतात. गडहिंग्लज : येथील बड्याची वाडी, हलकर्णी, भडगाव हे सर्वसाधारण महिलेसाठी, तर गिजवणे ओबीसीसाठी आरक्षित झाल्याने अनुक्रमे अप्पी पाटील व शैलजा पाटील यांचा पत्ता कापला गेला आहे. नेसरी खुला झाल्याने येथे विद्याधर गुरबे, संग्रामसिंह कुपेकर हे रिंगणात उतरू शकतात. चंदगड : माणगाव खुले झाल्याने महेश पाटील, ज्योती पाटील रिंगणात उतरू शकतात; तर तुडयेमधूनही ज्योती पाटील नशीब अजमावू शकतात. राजेंद्र परीट खुल्या चंदगडमधून उभे राहू शकतात. शाहूवाडी : सरूड, पिशवी, करंजफेण हे मतदारसंघ इतर मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्याने योगीराज गायकवाड, भाग्यश्री गायकवाड, लक्ष्मी पाटील यांचा पत्ता कापला गेला आहे. शित्तूर तर्फ वारूणमधून अमरसिंह पाटील, सर्जेराव पाटील-पेरीडकर हे पुन्हा नशीब अजमावू शकतात. रणवीरसिंह गायकवाड यांनीही तयारी केल्याने त्यांना याच मतदारसंघातून आपली राजकीय इनिंग सुरू करावी लागणार आहे. पन्हाळा : सातवे मतदारसंघ खुला झाल्याने येथे माजी शिक्षण सभापती अमर यशवंत पाटील यांना संधी आहे. कोडोली अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने माजी उपाध्यक्ष भारत पाटील यांची कोंडी झाली आहे. पोर्ले तर्फ ठाणे राखीव झाल्याने प्रकाश पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांची अडचण झाली आहे. यवलूज सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने मानसिंग पाटील यांना घरी बसावे लागणार आहे. कोतोली खुला झाल्याने माजी बांधकाम सभापती के. एस. चौगुले पुन्हा रिंगणात उतरू शकतात. कळे खुला झाल्याने येथून बाळासाहेब मोळे, सर्जेराव पाटील, विलास पाटील यांना संधी आहे. हातकणंगले : घुणकी राखीव झाल्याने शहाजी पाटील यांची अडचण झाली असून येथून दत्तात्रय घाटगे रिंगणात उतरू शकतात. भादोले, कुंभोज, हातकणंगले, कोरोची, कबनूर, पट्टणकोडोली, हुपरी राखीव झाल्याने अरुण इंगवले, देवानंद कांबळे, किरण कांबळे, धैर्यशील माने यांची गोची झाली आहे. शिरोली पुलाची सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने महेश चव्हाण यांची कोंडी झाली आहे. येथून विद्यमान सदस्या शोमिका महाडिक पुन्हा रिंगणात असू शकतात. शिरोळ : उदगाव अनुसूचित जातींसाठी आरक्षित झाल्याने अनिल मादनाईक यांची अडचण झाली. अब्दुललाट पहिल्यादांच अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्याने बांधकाम सभापती सीमा पाटील यांची कोंडी झाली. दत्तवाड, नांदणी खुला, तर दानोळी सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने येथेच अनेकांच्या उड्या पडणार आहेत. कागल : येथे कसबा सांगाव, सिद्धनेर्ली, बोरवडे हे मतदारसंघ खुले झाले आहेत. कसबा सांगावमधून नविद मुश्रीफ, युवराज पाटील, प्रकाश पाटील हे रिंगणात उतरू शकतात. सिद्धनेर्ली हा मतदारसंघ संजय घाटगेंचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे येथून अंबरीश घाटगे हे रिंगणात उतणार हे जवळपास निश्चित आहे. बोरवडेमधून भूषण पाटील व वीरेंद्रसिंह मंडलिक हे नशीब अजमावू शकतात. परशुराम तावरे यांचा कापशी सेनापती सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांनाही थांबावे लागणार आहे. हे पदाधिकारी घरी!जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, उपाध्यक्ष शशिकांत खोत, बांधकाम सभापती सीमा पाटील, शिक्षण सभापती अभिजित तायशेटे, समाजकल्याण सभापती किरण कांबळे यांचे मतदारसंघ आरक्षित झाल्याने त्यांना घरीच बसावे लागणार आहे. महिला व बालकल्याण सभापती ज्योती पाटील यांचाही मतदारसंघ गेला असला तरी त्या शेजारील मतदारसंघातून उभा राहू शकतात. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वच पदाधिकाऱ्यांच्या आरक्षण सोडतीत दांड्या उडाल्या आहेत. हे पदाधिकारी घरी!जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, उपाध्यक्ष शशिकांत खोत, बांधकाम सभापती सीमा पाटील, शिक्षण सभापती अभिजित तायशेटे, समाजकल्याण सभापती किरण कांबळे यांचे मतदारसंघ आरक्षित झाल्याने त्यांना घरीच बसावे लागणार आहे. महिला व बालकल्याण सभापती ज्योती पाटील यांचाही मतदारसंघ गेला असला तरी त्या शेजारील मतदारसंघातून उभे राहू शकतात. त्यामुळे जि. प.च्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वच पदाधिकाऱ्यांच्या आरक्षण सोडतीत दांड्या उडाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात काढण्यात आली. यावेळी मतदारसंघ आरक्षणातून सुटल्यानंतर एका इच्छुकाने नमस्कार करीत मनोमनी देवाचे आभार मानले.