शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

संच मान्यतेचा सुधारित प्रस्तावातून शाळा बंद करण्याचे धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 17:56 IST

संच मान्यतेचा हा सुधारीत प्रस्ताव म्हणजे ग्रामीण भागातील शाळा पूर्णपणे बंद करण्याचे धोरण आहे. त्यामुळे या प्रस्तावास कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने तीव्र विरोध केला आहे. या प्रस्तावाविरोधात शैक्षणिक व्यासपीठाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहिती व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड यांनी दिली.

ठळक मुद्देसंच मान्यतेचा सुधारित प्रस्तावातून शाळा बंद करण्याचे धोरणजिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा विरोध: मुख्याध्यापक संघात संयुक्त बैठक

कोल्हापूर : संच मान्यतेचा हा सुधारीत प्रस्ताव म्हणजे ग्रामीण भागातील शाळा पूर्णपणे बंद करण्याचे धोरण आहे. त्यामुळे या प्रस्तावास कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने तीव्र विरोध केला आहे. या प्रस्तावाविरोधात शैक्षणिक व्यासपीठाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहिती व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड यांनी दिली.शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघासह शिक्षण संस्था चालक संघ शिक्षक व सेवक यांच्या संघटनांची संयुक्त बैठक मुख्याध्यापक संघामध्ये संच मान्यता आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या संदर्भात चर्चा करण्यात आली. शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी दि. १३ जुलै २०२० रोजी सुधारीत संच मान्यता धोरण शासनाकडे प्रस्तावीत केले आहे. हे धोरण अतिशय चुकीचे असून शाळांच्यावर अन्याय करणारे आहे.

संच मान्यते संदर्भात शालेय शिक्षण विभागाचा दि.२८ ऑगस्ट २०१५चा निर्णय चुकीचा होता. त्या विरोधात महाराष्ट्रातून आंदोलने झाली. तरीही ते धोरण २०१५-१६ पासून राबविले गेले. संच मान्यतेचा सुधारित प्रस्तावामुळे ग्रामीण भागातील शाळा बंद होण्याचा धोका असल्याने त्याविरोधात आंदोलन केले जाणार असल्याचे लाड यांनी सांगितले. या बैठकीत नवे शैक्षणिक धोरणाविरोधी ठराव मंजूर करण्यात आला.

कायम विनाअनुदानित शाळांच्या आंदोलनास पाठींबा देण्यात आला. सचिव दत्ता पाटील यांनी विविध ठराव मांडले. यावेळी संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, शिक्षण संस्थाचालक संघ अध्यक्ष वसंतराव देशमुख, बाबासाहेब पाटील, सुधाकर निर्मळे, संतोष आयरे , पी. एन. पाटील, गजानन काटकर, राजाराम बरगे ,अशोक पाटील, मिलींद पांगिरेकर, जी ए पाटील, अशोक हुबळे ,एम .आर. पाटील, अजित रणदिवे, एस. के .पाटील, राजेश वरक, सुधाकर सावंत उपस्थित होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर