पेठवडगाव : वडगाव शहरात पोलिसांनी मोटरसायकल स्वारांविरोधात कारवाईचा धडाका लावला. यादव चौकात तब्बल ७० मोटारसायकल व आठ, चारचाकी, ३० विनामास्क तर, १५ दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. शुक्रवारी दुपारी दोनपासून ही कारवाई सुरू होती. मोटारसायकली रात्री सातनंतर दंड आकारणी करून सोडण्यात आल्या. त्यामुळे पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी झाली होती.
येथील एसटी स्टॅण्डजवळ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती सूर्यवंशी यांच्या पथकाने मोटारसायकल स्वारांवर कारवाईचा धडाका लावला. दुपारी दोन वाजल्यापासून वाहनधारकांना रस्त्यावर उभे करण्यात आले होते. रात्री सातनंतर प्रत्येकी दोनशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यावर केलेल्या कारवाईचे नागरिकांमधून स्वागत करण्यात आले आहे.
१८ वडगाव पोलीस कारवाई