शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरात उद्यापासून अवजड वाहतूक बंद, पोलीस अधीक्षक आदेश काढणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 14:47 IST

लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, पापाची तिकटी या परिसरातील दुकानात येणाऱ्या धान्यांच्या अवजड वाहनांमुळे शहरात वाहतुकीची कोंडी होते; त्यामुळे अशा वाहनांना उद्या, मंगळवारपासून शहरात कायमस्वरूपी प्रवेशबंदी घातली जाणार आहे. त्यासंदर्भातील आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख त्याच दिवशी काढण्याची शक्यता आहे. ही वाहतूक कायम बंद ठेवण्यासाठी शेकडो नागरिकांनी लेखी निवेदने पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

ठळक मुद्देकोल्हापूर शहरात उद्यापासून अवजड वाहतूक बंदपोलीस अधीक्षक आदेश काढणार 

कोल्हापूर : लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, पापाची तिकटी या परिसरातील दुकानात येणाऱ्या धान्यांच्या अवजड वाहनांमुळे शहरात वाहतुकीची कोंडी होते; त्यामुळे अशा वाहनांना उद्या, मंगळवारपासून शहरात कायमस्वरूपी प्रवेशबंदी घातली जाणार आहे. त्यासंदर्भातील आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख त्याच दिवशी काढण्याची शक्यता आहे. ही वाहतूक कायम बंद ठेवण्यासाठी शेकडो नागरिकांनी लेखी निवेदने पोलीस प्रशासनाला दिले आहेत.शहरात होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीबाबत सातत्याने अभ्यास केला जात आहे. शहरात येणारे धान्याचे ट्रक, टेम्पोमुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होतात. अवजड वाहनांना जे नियम घालून दिले आहेत, ते पाळले जात नाहीत. धान्य व्यापाऱ्यांना शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विक्रमनगर येथील जागेवर धान्याची गोडावून उभी करून दिली आहेत. त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सोईसुविधा व सुरक्षा उपलब्ध करून दिली आहे.

शहरात बाहेरून येणाऱ्या मालवाहू अवजड वाहनांना दिवसभरात प्रशासनाने बंदी घातली आहे. नेहमी शहराच्या मध्यवस्तीतील शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी व्यापारपेठेत होणारी वाहतुकीची कोंडी दूर झाल्याने या दोन्ही व्यापारपेठांनी अखेर मोकळा श्वास घेतला. सध्या प्रायोगिक तत्त्वावर अवजड वाहतूक काही दिवसांसाठी सुरू होती. ती आता कायमस्वरूपी बंद केली जाणार आहे. या निर्णयाबाबत पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या हरकती मागविल्या होत्या.त्याला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. शेकडो नागरिकांनी स्वत: शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात येऊन लेखी निवेदने दिली आहेत. त्यामध्ये अवजड वाहतूक कायम बंद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

व्यापाऱ्यांनी धान्यांची अवजड वाहने शहरात न आणता विक्रमनगर येथील गोडवूनमध्ये धान्य उतरविण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत. जे व्यापारी पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी सांगितले.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीkolhapurकोल्हापूर