शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसर्जनासाठी पोलीस सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 12:50 IST

सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात सोमवारी रात्री आठ पासून शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सुमारे ४० तास शहरातील मिरवणूक मार्गांवर प्रत्येक नागरिकांच्या हालचालींवर सीसीटीव्ही कॅमेºयांसह पोलीस लक्ष ठेवून असणार आहेत.

कोल्हापूर : सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री आठ पासून शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सुमारे ४० तास शहरातील मिरवणूक मार्गांवर प्रत्येक नागरिकांच्या हालचालींवर सीसीटीव्ही कॅमेºयांसह पोलीस लक्ष ठेवून असणार आहेत. चौका-चौकांत, गल्ली-बोळांत पोलीस असल्याने कोल्हापूर  शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील व पोलीस अधीक्षक संजय मोहिते हे संपूर्ण मिरवणुकीवर लक्ष ठेवून असणार आहेत.

सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला आज, मंगळवारी सकाळी नऊ वाजता प्रारंभ होत आहे. मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी मिरवणूक मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस मुख्यालय येथे सोमवारी बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, गृह पोलीस उपअधीक्षक सतिश माने, करवीरचे पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव आदींनी बंदोबस्तास असणाºया पोलिसांना मार्गदर्शन केले. तसेच स्वत: पोलीस अधीक्षक मोहिते यांनी मिरवणूक मार्गांवरील जागेची दूसºयांदा पाहणी केली.

मिरवणुकीचा मुख्य मार्ग मिरजकर तिकटीमार्गे बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी, गंगावेश, जामदार क्लबमार्गे पंचगंगा घाट असा आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे साध्या वेशात पोलिसांची गस्त असणार आहे. तसेच विविध ठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक नागरिकाची हालचाल टिपणार आहेत.

उभारण्यात आलेल्या टेहळणी मनोºयांवरूनही दुर्बिणीच्या साहाय्याने पोलीस लक्ष ठेवून असणार आहेत. संवेदनशील ठिकाणी शस्त्रधारी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.मद्यप्यांवर कठोर कारवाई

प्रत्येक चौकात ब्रेथ अ‍ॅनालायझरचा वापर करण्यात आला असून, दारू पिऊन अथवा मादक द्रव्ये सेवन करून, घेऊन येणाºयांवर कारवाई केली जाणार आहे. हुल्लडबाज व टवाळखोर व्यक्तींकडून महिलांना होणारा त्रास रोखण्यासाठी पोलिसांचे छेडछाडविरोधी पथक सतर्क ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी चौकाचौकांत तंबू उभे केले आहेत.असा आहे पोलीस बंदोबस्त

पोलीस अधीक्षक - १अप्पर पोलीस अधीक्षक - २पोलीस उपअधीक्षक - ६पोलीस निरीक्षक - २९पोलीस उपनिरीक्षक -१०४पोलीस कर्मचारी (पुरुष-महिला) - २२००होमगार्ड (पुरुष) -१०००होमगार्ड (महिला)- २००ध्वनिमापन अधिकारी व कर्मचारी (प्रदूषण मंडळ) - ८बे्रथ अ‍ॅनालायझर मशीनकरिता कर्मचारी- ३बॉम्ब शोधपथक, व्हिडिओ कॅमेरा, टेहळणी पथक

इतर जिल्'ांतील पोलीस

पोलीस निरीक्षक -४सहायक पोलीस निरीक्षक - ९जलद कृती दल तुकडी - १४०राज्य राखीव दलाची तुकडी २ - (६०)