शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारची प्रतिमा जपताना पोलिसांची तारांबळ

By admin | Updated: June 8, 2017 01:09 IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नी सुकाणू समितीची निदर्शने : आंदोलक ताब्यात; दडपशाही कराल तर त्याच भाषेत उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, या मागणीसाठी बुधवारी कोल्हापूर जिल्हा शेतकरी सुकाणू समितीच्यावतीने शिवाजी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करू न दिल्याने संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. सरकारची प्रतिमा जपताना पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.अल्पभूधारकांना कर्जमाफीचे गाजर दाखवून सरकार शेतकऱ्यांमध्ये फूट पाडत असून ‘सरसकट कर्जमाफी देता येत नसेल तर खुर्ची सोडा,’ असा इशारा यावेळी समितीच्यावतीने देण्यात आला. कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गेले सात दिवस शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दिवसेंदिवस आंदोलनाची तीव्रता वाढत असून, शेतकरी आक्रमक झाले आहेत. सर्वपक्षीय सुकाणू समितीच्यावतीने शिवाजी चौकात जोरदार निदर्शने करीत सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचे नियोजन होते. शेकापच्या कार्यालयात हा पुतळा तयार करण्यात आला. तो घेऊन शिवाजी रोडवरून दोन आंदोलक मोटारसायकलवरून घेऊन आले; परंतु पोलिसांनी त्यांना गाडीवरून उतरूच दिले नाही. त्यांच्याकडून हा पुतळा पोलिसांनी हिसकावून घेतला. त्यावेळी कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली. हा पुतळा घेऊन पुढे गर्दीतून वाट काढत धावणारे पोलीस व त्यांच्या मागे कार्यकर्ते असे चित्र तिथे दिसले. पोलिसांनी हा पुतळा केएमटी बसमधून लगेच पसार केला व सरकारच्या प्रतिमेची जपणूक केली. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने शिवाजी चौक दणाणून गेला. आंदोलनकर्ते आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. राज्यातील शेतकरी एकसंध झाल्याने सरकार अस्वस्थ झाले आहे. त्यामुळे आंदोलनात फूट पाडण्याचे पाप सुरू असल्याचा आरोप करीत माजी आमदार संपतराव पवार म्हणाले, ‘अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन हे फसवे आहे. त्यातून शेतकऱ्यांचे भले होणार नाही. सात दिवस झाले आंदोलन सुरू असताना सरकार बहिरे असल्यासारखे वागत आहे; पण लक्षात ठेवा गाठ शेतकऱ्यांशी आहे. पोलिसांच्या बळावर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नका नाही तर आम्हालाही त्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल.’ ‘माकप’चे चंद्रकांत यादव म्हणाले, सरकारचा खरा चेहरा आता शेतकऱ्यांसमोर आला आहे. निवडणुकीत घोषणा करायच्या आणि पाच वर्षे सत्ता भोगायची, ही भाजपची जुनी पद्धत आहे. सरकारची दडपशाही खपवून घेणार नसून, शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. नाही तर पेशवाईवर हल्लाबोल करावा लागेल. यावेळी किसान सभेचे प्रा. उदय नारकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, अ‍ॅड. माणिक शिंदे, बाबासाहेब देवकर, अतुल दिघे, सुभाष निकम, भारत पाटील, एम. डी. निश्चिते, संभाजी जगदाळे, जनार्दन पाटील, जगन्नाथ कांदळकर, गिरीष फोंडे, आदी उपस्थित होते. चंद्रकांतदादांच्या घराला छावणीचे स्वरूपलोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र झाले असून पुढचा टप्पा म्हणून शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा दिलेल्या इशाऱ्याचा पोलीस प्रशासनाने चांगलाच धसका घेतला. बुधवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संभाजीनगर, नाळे कॉलनी येथील घराला पोलिसांनी अक्षरश: वेढा घातला होता. शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा, यांसह विविध मागण्यांसाठी १ जूनपासून राज्यभरातील शेतकरी संपावर आहेत. मोर्चे, टाळे ठोक आंदोलनानंतरही सरकार दखल घेत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी प्रत्येक जिल्ह्यातील मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संभाजीनगर येथील नाळे कॉलनीतील घराला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त दिला होता. सकाळी आठ वाजल्यापासून सुमारे २५-३० पोलिसांची कुमक रवाना करण्यात आली होती. मंत्री पाटील यांच्या घराकडे येण्यासाठी तीन रस्ते आहेत. प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर चार-पाच पोलीस उभे होते, तर घराच्या दारातही तितकेच पोलीस उभे होते. शिवाजी चौकातील आंदोलन झाल्यानंतर कदाचित आंदोलनकर्ते संभाजीनगरकडे रवाना होतील, असा पोलिसांचा अंदाज होता, त्यामुळे तेथूनच आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले तरीही इतर कार्यकर्ते घराकडे येतील, यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क होती. शिवसेनेने प्रामाणिकता सिद्ध करावीशिवसेना व भाजपमध्ये मतभेद असल्याचे दाखवत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेने पाठिंबा दिला असला तरी त्यांनी आक्रमकपणे सरकारविरोधात बाहेर पडले पाहिजे. अन्यथा, शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याची भावना राज्यात निर्माण होईल. शिवसेनेला प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी हीच वेळ असल्याचे संपतराव पवार यांनी सांगितले.