शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

शेतकरी कुटुंबातील पी.आर.पाटील ​​​​​​​आय.पी.एस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 16:30 IST

सरूड (ता. शाहूवाडी ) येथील पी. आर. पाटील यांची भारतीय पोलिस सेवेत पोलिस अधीक्षक पदी (आय.पी.एस) निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीने सरुड गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा गेला खोवला आहे

ठळक मुद्देशेतकरी कुटुंबातील पी.आर.पाटील ​​​​​​​आय.पी.एसपोलिस अधिकाऱ्यांच्या गावच्या शिरपेचात मानाचा तुरा

अनिल पाटील सरूड :  सरूड (ता. शाहूवाडी ) येथील पी. आर. पाटील यांची भारतीय पोलिस सेवेत पोलिस अधीक्षक पदी (आय.पी.एस) निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीने सरुड गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा गेला खोवला आहे. प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द आणी चिकाटीच्या जोरावर विक्रीकर निरीक्षक, तहसिलदार, पोलिस उपअधिक्षक, पोलिस उपायुक्त ते पोलिस अधिक्षक (आय.पी.एस) पदापर्यंतचा त्यांचा २३ वर्षाचा प्रवास हा आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे . पी. आर. पाटील हे सध्या कोल्हापूर नागरी हक्क सरंक्षण विभागाचे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.सरुड येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या पी. आर. पाटील यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सरुड येथे तर महाविधालयीन शिक्षण मलकापूर येथे झाले. विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर १९९५ मध्ये त्यांनी स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाला सुरवात केली. दोनच वर्षामध्येच त्यांनी विक्रीकर निरीक्षक परिक्षेत यश सपांदन केले. त्यांनतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परिक्षेतुन १९९८ मध्ये त्यांची तहसिलदारपदी निवड झाली. पंरतू एवढयावर समाधान न मानता मुंबई उपायुक्त विश्वास नांगरे - पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन १९९९ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतुनच त्यांनी पोलिस उपअधिक्षकपदाला गवसणी घातली.

प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधिक्षक म्हणून प्रथम त्यांची जळगाव येथे नेमणूक झाली. प्रशिक्षणाचा कालावधी पुर्ण झाल्यानंतर अचलपूर (जि. अमरावती ) येथे त्यांची नेमणूक करण्यात आली. अचलपूर बरोबरच त्यांनी पंढरपूर,पुणे ग्रामीण ( राजगुरुनगर) येथेही पोलिस उपअधिक्षक म्हणून उत्तम सेवा बजावली. त्यांनतर पुणे गुन्हे अन्वेषण शाखेत उपायुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणत मोठमोठ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या.

पुण्याहुन त्याची नागपूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे पोलिस अधिक्षक म्हणून पदोन्नतीवर बदली झाली. त्यांनतर त्यांची कोल्हापूर नागरी संरक्षण हक्क विभागाचे पोलिस अधिक्षक म्हणून बदली झाली. गेल्या दिड वर्षापासून ते या पदावर कोल्हापूर येथे कार्यरत आहेत. येथे सेवा बजावत असतानाच पाटील यांची भारतीय पोलिस सेवेमध्ये पोलिस अधिक्षकपदी (आय.पी.एस) म्हणून निवड झाली आहे. आजपर्यंतच्या त्यांच्या या वाटचालीमध्ये त्यांना मुंबईचे उपायुक्त विश्वास नांगरे - पाटील, पोलिस अधिक्षक संदिप दिवाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

सरूड, पोलिस अधिकाऱ्यांच्या गावातील पी.आर. पाटील सरूड गाव हे पोलिस अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. पी.आर. पाटील यांच्या स्पर्धा परिक्षेतील यशानंतरच गावात किंबहुना शाहूवाडी तालुक्यात खऱ्या अर्थाने स्पर्धा परिक्षेचे वारे वाहु लागले. पी. आर. पाटील यांचा आदर्श घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील तसेच परिसरातील अनेक युवकांनी स्पर्धा परिक्षेत यश संपादन केले आहे.

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर