शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गणेश मंडळांवर पोलिसांचा दांडगावा

By admin | Updated: July 19, 2016 00:52 IST

शांतता बैठक ‘अशांत’ : ‘हम करे सो’मुळे कार्यकर्ते संतप्त

इचलकरंजी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घेतलेल्या बैठकीत सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची मुस्कटदाबी करत ‘हम करे सो कायदा’ अशी भूमिका पोलिसांनीच घेतल्यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांसह गणेशभक्तांत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येणारा गणेशोत्सव ‘विशेष’ जल्लोषात साजरा होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी चोख नियोजन करणे आवश्यक असताना बैठक घेऊन ‘स्टंट’ केल्याने पोलिस खात्यासह सामान्यांनाही याचा त्रास होईल, असे मत जाणकारांतून व्यक्त होत आहे.येथील राजीव गांधी भवनमध्ये सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील तिन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची शांतता बैठक घेण्यात आली. पोलिस ठाण्यातील नवख्या अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून काही पोलिसांनी या बैठकीचे आयोजन केले होते. गणेश मंडळांना सोशल मीडियातून संदेश दिला गेला. हा संदेश दुसऱ्याच्या नावे कार्डभिशी चालविणाऱ्याने गोपनीय पोलिसाच्या नावासमवेत पाठविल्याने मंडळाचे कार्यकर्तेही चक्रावून गेले.वरिष्ठांसमोर मंडळांची गर्दी व्हावी, यासाठी पोलिसांकडून निरोप देताना बैठकीस गैरहजर राहिल्यास मंडळांना कोणताही परवाना दिला जाणार नाही, असा दम भरला गेला. त्यामुळे अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी भीतीपोटी या बैठकीस हजेरी लावली. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना पोलिसांनी सामंजस्यपणा आणि कर्तव्याची भूमिका पार पाडणे गरजेचे असताना दंडुकशाहीचा वापर करून सुरू असलेला प्रकार अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांना धक्कादायक वाटला. पोलिसांच्या या कार्यपद्धतीवर मंडळांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी बोलविलेल्या या बैठकीत कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय झाला नाही. त्यामुळे केवळ कागदपत्रे रंगविण्यासाठी ही बैठक झाली असल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)