शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस प्रशासनातर्फे ‘निर्भया’चा गौरव महिला दिन : रॅली, मेळावा, आरोग्य शिबिर, स्नेहभोजन, भेटवस्तू वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 01:31 IST

कोल्हापूर : कोल्हापूर पोलीस दलातर्फे ‘जागतिक महिला दिन’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

कोल्हापूर : कोल्हापूर पोलीस दलातर्फे ‘जागतिक महिला दिन’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते निर्भया पथकातील महिला अधिकारी, पोलीस यांचा गौरव करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून रुची राणा उपस्थित होत्या.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, रूपाली नांगरे-पाटील, भारती मोहिते, निर्भया पथकाचे अधिकारी, वुई केअर संस्थेच्या सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी रुची राणा यांनी मार्गदर्शन केले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी यांनी निर्भया पथकाच्या कामगिरीची माहिती दिली. यावेळी वुई केअर समुपदेशन संस्थेतील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. गडहिंग्लज विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे यांनी आभार मानले.गुरुवारी दिवसभर शाहूपुरी पोलीस ठाण्याचे काम महिला अधिकारी व कर्मचारी पाहत होत्या. या ठाण्यातर्फे ‘महावितरण’च्या कोल्हापूर कार्यालयातील महिलांच्या मोटारसायकल रॅलीचे स्वागत करण्यात आले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक तृप्ती देशमुख यांच्यासह पोलीस महिला कर्मचारी उपस्थित होत्या. यावेळी देशमुख यांनी पोलीस विभागाबाबत माहिती दिली. त्यानंतर महिला मेळावा, आरोग्य शिबिर, स्नेहभोजन व भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम पोलीस निरीक्षक संजयमोरे यांच्या मार्गदर्शनाखालीझाला.कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महिलांची सन्मान रॅली काढण्यात आली. कोडोली हायस्कूल येथे हा कार्यक्रम झाला. महिला पोलिसांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.सुहासिनीचे वाण...जागतिक महिला दिनानिमित्त शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी महिला पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना सुहासिनीचे वाण म्हणून साडी दिली.हा कार्यक्रम गुरुवारी रात्री शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाला.शाहूपुरी, कोडोली पोलीस ठाणे यांच्यातर्फे विविध उपक्रमांनी ‘महिला दिन’ साजरा.