पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल चिंतामणी बांबळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून पळून गेलेल्या आलम शेख , बैथुल शेख या दोघा आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांना शाहूवाडी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. मंगळवार, दि २ मार्च रोजी मलकापूर येथून आलम शेख व बैथूल शेख हे दोघे आपल्या दुचाकीवरून जात असताना चनवाड फाट्यावर गाडी स्लीप होऊन पडले होते. आलम व बैथुल शाहूवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आले असता त्यांनी पोलीस ठाण्यात दंगा करून दारूच्या नशेत पोलिसांना शिवीगाळ केली होती. पोलीस या दोघांना अटक करून कोर्टात नेत असताना दोघांनी पोलिसांवर हल्ला करून पळ काढला होता. यानंतर पोलिसांनी दोघांनाही शिताफीने अटक केली.
पोलीस कॉन्स्टेबल हल्ला प्रकरण: आरोपींना न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:24 IST