शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रोडरोमिओंवर पोलिसांची कारवाई

By admin | Updated: August 29, 2014 00:07 IST

पालकांतून समाधान व्यक्त : १० ते १५ युवकांची धरपकड

कोपार्डे : येथील सांगरूळ फाटा ते कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या रस्त्यावर रोडरोमिओंवर आज, गुरुवारी पोलिसांनी अचानक कारवाई करीत पोलिसी खाक्या दाखविला. पोलिसांच्या कारवाईदरम्यान रोडरोमिओंची केविलवाणी अवस्था पाहून लोकांकडून पोलिसांबद्दल आभाराची भावना व्यक्त होत होती.आज, गुरुवारी करवीर पोलिसांत एका महाविद्यालयीन मुलीने आपले नाव न सांगण्याच्या अटीवर करवीर पोलिसांत या मार्गावर मुलींना त्रास देत असलेल्या रोडरोमिओंबद्दल तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत करवीरचे पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी या मार्गावर आपले पोलीस पथक पाठविले होते. या पोलीस पथकाने कॉलेज व महाविद्यालय सुटण्याच्या वेळेत या ठिकाणी अचानक छापा टाकून, रोडरोमिओंना हेरत एक-एक रोडरोमिओला पकडत कारवाई सुरू केल्याने एकच धावपळ सुरूझाली. त्यामुळे कॉलेजला आलेल्या मुलांमध्येही काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले.मात्र, पोलिसांनी नेमक्या रोडरोमिओंना पकडून १० ते १५ जणांना पोलीस गाडीत टाकले. यावेळी पोलिसी खाक्यापासून वाचण्यासाठी रोडरोमिओंची झालेली धडपड फार केविलवाणी होती. ‘साहेब, मी त्यातला नाही. मी बाजारासाठी आलो होतो. मी कोल्हापूरला निघालोय. साहेब, मला सोडा नाहीतर मला घरात घेणार नाहीत...’ अशा विनवण्या ऐकायला मिळत होत्या. मात्र, यामुळे पालक व महाविद्यालयीन मुलींमध्ये समाधानाच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.करवीरच्या पश्चिम भागात कुंभी-कासारी येथे एक महाविद्यालय, दोन ज्युनिअर कॉलेज, चार प्राथमिक व माध्यमिक शाळा, विविध संगणक कोर्स, व्यवसाय शिक्षण, आदी संस्थांत करवीर, पन्हाळा, गगनबावडा तालुक्यांतील किमान एक हजार मुली शिक्षणासाठी येतात. येथील शैक्षणिक वातावरण ग्रामीण असल्याने कोल्हापूर शहरात शिक्षणासाठी मुलींना पाठविण्यापेक्षा कुंभी-कासारी येथे पाठविणे पालक सुरक्षित मानतात. मात्र, काही रोडरोमिओंमुळे शैक्षणिक वातावरण गढूळ झाले होते. यासाठी शिक्षण संस्थाही अशा रोडरोमिओंवर कारवाई करण्यापेक्षा हात वर करण्यातच धन्यता मानत होत्या. मात्र, एका मुलीच्या तक्रारीवर आज करवीर पोलिसांच्या पथकाने कारवाई केल्याने आता अशा रोडरोमिओंवर अंकुश येऊ शकतो. याबाबत पकडलेल्या रोडरोमिओंच्या नावांबाबत विचारणा केली असता प्रथम यांना समजावणार आहे, असे सांगत नावे देण्यास नकार दिला. (वार्ताहर)