शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कवितेला समीक्षकांची नव्हे वाचकांची गरज : राजन गवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 16:51 IST

आजच्या घडीला कवितेला समीक्षकांची नव्हे, तर चांगल्या रसिक वाचकांची गरज आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस यांनी केले. कविता ही कविता असते, तिचे वर्गीकरण होऊ शकत नाही; पण मास्तरांकडून त्याची फोड करून शिकवली जात असल्याने त्यातील सौंदर्य नष्ट होत असल्याने अशा मास्तरांचाच बंदोबस्त करायला हवा, असेही गवस यांनी सांगितले.

ठळक मुद्देकवितेला समीक्षकांची नव्हे वाचकांची गरज : राजन गवस दीपक बोरगावे लिखित ‘भवताल आणि भयताल’ कवितासंग्रह प्रकाशित

कोल्हापूर : आजच्या घडीला कवितेला समीक्षकांची नव्हे, तर चांगल्या रसिक वाचकांची गरज आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस यांनी केले. कविता ही कविता असते, तिचे वर्गीकरण होऊ शकत नाही; पण मास्तरांकडून त्याची फोड करून शिकवली जात असल्याने त्यातील सौंदर्य नष्ट होत असल्याने अशा मास्तरांचाच बंदोबस्त करायला हवा, असेही गवस यांनी सांगितले.कवी दीपक बोरगावेलिखित आणि सम्यक विद्रोही प्रबोधन संस्था प्रकाशित ‘भवताल आणि भयताल’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन सोमवारी शाहू स्मारक भवनमध्ये झाले. यावेळी गवस प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कवी बोरगावे यांच्यासह मेघा पानसरे, धनाजी गुरव, सीमा मुसळे, विश्वास सायनाकर यांची प्रमुख उपस्थिती होती.बोरगावे यांनी कवी म्हणवून घेणे कमीपणाचे वाटत असल्याचे मनोगतात सांगितले, याचा धागा पकडून गवस यांनी कवी म्हणवून असे म्हणणे म्हणजे कविता समजलीच नाही, अशी रोखठोक भूमिका मांडली. भोवतालची सळसळ फक्त कवी शब्दबद्ध करू शकतो. नुसत्या वाचनाने कविता समजत नाही, तिच्याशी तुम्ही किती झोंबता, भांडता, भीडता यावर ती किती समजली हे कळत असते, असेही गवस यांनी सांगितले.कवी बोरगावे यांनी आयुष्यातील वैयक्तिक आघाताने कवितेकडे वळल्याचे सांगितले. याचवेळी उजव्या शक्ती सत्तेच्या केंद्रस्थानी आल्याने कवितालेखन अधिक ताकदीने झाल्याचे सांगितले. मेघा पानसरे यांनी टोकाच्या अस्थिर कालखंडात माणूस म्हणून व्यक्त होणे ही अवघड होत असताना हा कवितासंग्रह व्यक्त होण्यासाठी मार्गदर्शन ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

सीमा मुसळे यांनी कवितासंग्रहाचा समग्र आढावा घेताना समाजाचे बदलते मानस यातून प्रतिबिंबीत होत असल्याचे सांगितले. धनाजी गुरव यांनी सध्याची परिस्थिती आणीबाणीपेक्षा भयंकर असून, आजूबाजूचा भयताल भयताड झाल्यासारखे वाटत असल्याचे सांगितले. प्रशांत नागावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

 

 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर