शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

वचन पावित्र्याची अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 17:14 IST

पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी शासनाने मान्य केली; त्यामुळे सुट्टीच्या मोबदल्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामाची हमी देत जनतेला दिलेल्या वचनाचे पावित्र्य जपण्याची शपथ शुक्रवारी घेतली.

ठळक मुद्देवचन पावित्र्याची अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली शपथसुट्टीच्या मोबदल्यात कामाची हमी

कोल्हापूर : पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी शासनाने मान्य केली; त्यामुळे सुट्टीच्या मोबदल्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामाची हमी देत जनतेला दिलेल्या वचनाचे पावित्र्य जपण्याची शपथ शुक्रवारी घेतली.महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, जनगणना संचालनालयाचे उपसंचालक सतीश पायस, जिल्हा सांख्यिकी अधिकारी भूषण देशपांडे, जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, आदी प्रमुख उपस्थित होते.अधिकारी-कर्मचाºयांनी दिलेली शपथ अशी - ‘छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या पुरोगामी भूमीतील नागरिक असण्याचा आम्हांस सार्थ अभिमान आहे. या थोर पुरुषांच्या महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे अथक प्रयत्नशील असतो.

यापुढेही कार्यालयीन कामाच्या वेळेत जनतेची कामे अधिक वेगाने व सकारात्मक दृष्टीने सदैव करीत राहू. आमच्या रजा अथवा सुट्ट्या यांमुळे जनतेच्या कामांत कोणतीही अडचण येणार नाही. आमची सर्व ऊर्जा, सर्जनशीलता आणि उत्साह यांद्वारे २१व्या शतकातील वैभवशाली नवमहाराष्ट्राच्या उभारणीसाठी आम्ही वचनबद्ध होत आहोत. वचनाचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी जनतेचे सेवक या नात्याने आमच्या कार्यसंस्कृतीद्वारे आम्ही स्वीकारीत असून, त्याची हमी महाराष्ट्राच्या जनतेला देत आहोत.’ अशी शपथ घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुट्टीच्या मोबदल्यात कामाची हमी दिली.

 

 

टॅग्स :Governmentसरकारcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर