शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

खासगी जागा स्वच्छतेबाबत नोटिसा द्या : -आयुक्त कलशेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 01:11 IST

खासगी जागेतील स्वच्छता करण्यासंदर्भात तसेच तेथील तणकट काढण्याकरिता संबंधित मिळकतधारकांना नोटीस बजावा; तसेच संबंधित मिळकतधारकाकडून कामाची पूर्तता न झाल्यास महापालिकेमार्फत स्वच्छता करून तिचा खर्च संबंधितांकडून वसूल

ठळक मुद्देआढावा बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश; ...अन्यथा खर्च संबंधितांकडून वसूल करावा‘एक लाख १२ हजार घरफाळा बिलांचे वाटप’

कोल्हापूर : खासगी जागेतील स्वच्छता करण्यासंदर्भात तसेच तेथील तणकट काढण्याकरिता संबंधित मिळकतधारकांना नोटीस बजावा; तसेच संबंधित मिळकतधारकाकडून कामाची पूर्तता न झाल्यास महापालिकेमार्फत स्वच्छता करून तिचा खर्च संबंधितांकडून वसूल करावा, असे निर्देश मंगळवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले.

ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात आयुक्त कलशेट्टी यांनी आरोग्य विभागाकडील सर्व विभागीय आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, सहायक आरोग्य निरीक्षक यांची स्वच्छ भारत अभियान, नालेसफाई, ओ.डी.एफ. प्लस, आदी विषयांच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित केलेली होती.

बैठकीमध्ये आयुक्त कलशेट्टी यांनी शहरातील पूर परिस्थितीबाबत माहिती घेतली. त्यानंतर सर्व आरोग्य निरीक्षक यांना शहरातील मुख्य रस्ते स्वच्छ करावेत, कंटेनरसभोवतालचा कचरा तातडीने उठाव करण्यासाठी विशेष पथक तयार करावे, शहरातील शौचालयांची नियमितपणे स्वच्छता करावी, शौचालयासभोवतालचा परिसराचे सुशोभीकरण करावे, अशा सूचना दिल्या. शहरातील सर्व तरुण मंडळे, धार्मिक मंडळे, भक्तांना महाप्रसाद अथवा अन्य धार्मिक कार्यांवेळी प्रसाद देण्याकरिता कागदी अथवा प्लास्टिक पत्रावळी, प्लेट, ग्लास, ताट, कप, आदी न वापरता स्टीलच्या प्लेट वापरण्याबाबत आवाहन करण्याच्या सूचना दिल्या.

झोपडपट्टी भागामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याबरोबरच झोपडपट्टी सुशोभीकरण करण्याकरिता नोडल आॅफिसर म्हणून अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, शहर अभियंता, जल अभियंता, आरोग्याधिकारी, उपशहर अभियंता, मुख्य आरोग्य निरीक्षक, तसेच इतरही वरिष्ठ अधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. आढावा बैठकीस उपायुक्त मंगेश शिंदे, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील उपस्थित होते.‘एक लाख १२ हजार घरफाळा बिलांचे वाटप’कोल्हापूर : मनपा प्रशासनाकडून दि. १ जून ते २८ जूनपर्यंत एक लाख २७ हजार ७६० घरफाळा बिले पोस्टात वितरणाकरिता दिली, त्यापैकी एक लाख १२ हजार ६६१ घरफाळा बिले पोस्ट कार्यालयामार्फत वितरीत केली आहेत, अशी माहिती येथील डाकघरचे वरिष्ठ अधीक्षक ईश्वर पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

सन २०१६ पासून भारतीय डाक विभागामार्फत कोल्हापूर महानगरपालिकेची घरफाळा बिले स्पीड पोस्टाने वितरीत केली जात आहेत. डाक विभागामार्फत घरफाळा वितरीत करण्यास सुरुवात केल्यापासून महापालिकेच्या महसुलात भरीव वाढ झाली आहे, जी याआधी महापालिकेमार्फत घरफाळा वितरीत केली जात असताना होत नव्हती. डाक विभागाची विश्वासार्हता व पारदर्शकतेमुळे हे घरफाळा बिले वाटपाचे काम महानगरपालिकेने डाक विभागास सुपूर्द केले. गेल्या दोन वर्षांपासून आजतागायत डाक विभागाने बिले वाटपाचे काम अत्यंत गतीने वितरीत केले असून आजही त्याच गतीने केले जात आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे.

१५ हजार ३७९ इतकी बिले वाटण्याचे काम प्रलंबित आहे. अपूर्ण पत्ते, मिळकतधारक मिळून न येणे या कारणांमुळेही बिले प्रलंबित राहिली असल्याचेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.कोल्हापूर शहरातील स्वच्छता तसेच संभाव्य पूरस्थितीबाबत आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मंगेश शिंदे, विजय पाटील उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका