शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

प्रीमियर लीगसाठी खेळाडू सज्ज

By admin | Updated: January 13, 2015 00:06 IST

पहिलीच स्पर्धा : शैबाज पठाणवर सर्वाधिक बोली, चेंडूचे अनावरण

राजापूर : आयपीएल क्रिकेटस्पर्धेच्या धर्तीवर राजापुरात प्रथमच आयोजित करण्यात येत असलेल्या राजापूर अंडरआर्म प्रीमिअर लीगच्या लोगोचे व स्पर्धेतील चेंडूचे अनावरण आणि या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा लिलाव रविवारी राजापूर हायस्कूलच्या कलामंदिर सभागृहात पार पडला. लिलावामध्ये सर्वाधिक बोली राजापुरातीलच शैबाज पठाणवर लागली. त्याला राजापूर रॉयल्सने ८ हजार रूपयांना विकत घेतले.लिलाव झालेल्या सर्व खेळाडूंशी दोन वर्षांचा करार केला जाणार असून, हा करार त्यांचेवर बंधनकारक राहणार आहे. आता दि. २४ ते २६ जानेवारी २०१५ या कालावधीत शहरातील कै. द. ज. सरदेशपांडे खुल्या नाट्यगृहाच्या जागेत प्रकाशझोतातील क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे.राजापूर हायस्कूलच्या कलामंदिर सभागृहात व्यंकटेश तानवडे व शर्मद, अ‍ॅड. शशिकांत सुतार यांच्या हस्ते लोगोचे अनावरण, तर राजापूर तालुका प्रेस कलबचे सल्लागार महेश शिवलकर यांच्याहस्ते चेंडूचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ११९ खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. यामध्ये तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील खेळाडूंचा समावेश होता. राजापुरातील शैबाज पठाण याने बाजी मारली. त्याला ८ हजार रूपयांना प्रवीण तोरस्कर मालक असलेल्या राजापूर रॉयल्स संघाने विकत घेतले. याशिवाय नितिश कुडाळी, प्रथमेश सूद, निनाद शिर्सेकर, वैभव चव्हाण, मुनसिब मुल्ला, समीर नवाळे, वैभव नागवेकर, अशपाक गडकरी, संकेत गुरव, रविश सय्यद आदी खेळाडूंसाठीही बोली लावण्यात आली. यावेळी सहयोग असोसिएटसचे व्यंकटेश तानवडे, शर्मद, राजापूरचे कार्याध्यक्ष अड. शशिकांत सुतार, राजापूर तालुका प्रेस कलबचे सल्लागार महेश शिवलकर, अध्यक्ष सुंदर पाटणकर तसेच नगरसेवक संजय ओगल, रवींद्र बावधनकर, हनिफ मुसा काझी आरयुपीएलचे संयोजक स्वप्नील गोठणकर, नीलेश रहाटे, महेश मणचेकर, सुबोध बाकाळकर, जगदीश ठोसर, सचिन अणसुरकर, दिनेश पवार, निलेश खानविलकर, सुशील टिळेकर, राजन करंगुटकर, परेश शिंदे, विनायक जोगले, सुनील जाधव, माधव चव्हाण, संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन स्वप्नील गोठणकर, प्रास्ताविक संजय मांडवकर यांनी केले. लिलाव पुकारणी जितेंद्र मालपेकर यांनी केली. दि. २४ ते २६ जानेवारी २०१५ या कालावधीत शहरातील कै. द. ज. सरदेशपांडे खुल्या नाट्यगृहाच्या जागेत दररोज सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे. तालुक्यातील शौकिनांसाठी ही पर्वणी आहे. (प्रतिनिधी)सर्वाधिक बोली मिळालेले पहिले पाच खेळाडू - शैबाज पठाण, राजापूर (८ हजार रूपये) राजापूर रायल्स, मंदार सनगरे, रत्नागिरी (६ हजार रूपये) राजापूर लायन्स, नितिश कुडाळी, राजापूर (६ हजार रूपये) राजापूर नाईट रायडर्स, प्रथमेश सूद, राजापूर (५ हजार ३०० रूपये) राजापूर फिनिक्स, अमर भोंगाळे, चिपळूण (५ हजार रुपये) राजापूर रॉक्स.संघाचे नावसंघमालकांचे नावराजापूर इंडियन्सरवींद्र बावधनकरराजापूर फिनीक्सतुकाराम गुरवराजापूर लायन्ससंजय दुधवडकरराजापूर नाईट रायडर्सहनिफ मुसा काझीराजापूर रॉक्ससुशांत मराठेराजापूर ब्रिगेडिअर्सअझिम चौगुलेराजापूर टायगर्सविनय गुरवराजापूर रॉयल्सप्रवीण तोरस्करआयपीएलच्या धर्तीवर राजापुरात प्रथमच स्पर्धा. कलामंदिर सभागृहात खेळाडूंसाठी लिलाव.११९ खेळाडूंचा लिलाव. २४ ते २६ जानेवारी दरम्यान स्पर्धा रंगणार. महासंग्रामासाठी राजापूर सज्ज. सर्वत्र उत्साह.