दापोली कृषी विद्यापीठातील माजी विद्यार्थी यांनी समाजकार्यासाठी या संस्थेची स्थापना केली असून, अनेक सामाजिक उपक्रम राबवून गरजूंना मदतीचा हात पुढे करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
संस्थेच्या माध्यमातून या KVF देवराई बनवणे स्वप्न आहे व यातूनच पर्यावरणाचा समतोल राखत मुलांना, ग्रामस्थांना आरोग्यदायी पोष्टिक फळे मिळणार आहेत. फळझाडांसोबत कडीपत्ता, शेवगा, पपया यांचा शालेय पोषण आहारामध्ये फायदा होणार आहे. अनेक पशूपक्षी यांनाही अन्न व निवारा उपलब्ध करून देणे हादेखील उद्देश असल्याचे संस्थेचे सचिव राजन कामत यांनी सांगितले.
या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, मार्केट कमिटीचे माजी उपसभापती अनिल अमित कांबळे, संस्थेचे सचिव राजन कामत, मुख्याध्यापक दिलीप पाडळकर व शिक्षक बाजीराव पाटील, जान्हवी पाटील, आर. डी. यादव, कृषी सहाय्यक सतीश वर्मा व मोहन पाटील यांचेसह प्रगतशील शेतकरी तसेच सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.