शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पिंकेश ठक्कर, कोंडेदेशमुख ‘बेस्ट रायडर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:20 IST

कोल्हापूर : वेड्यावाकड्या आणि निसरड्या वळणांवर वाऱ्याच्या वेगाने धावणाºया दुचाकींचा आवाज, आबालवृद्ध प्रेक्षकांचा उत्साह यांच्या साथीने शेंडा पार्क येथील खुल्या मैदानात डर्ट ट्रॅक स्पर्धा झाली. यामध्ये देशभरातील ७० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेत पिंकेश ठक्कर, युवराज कोंडेदेशमुख बेस्ट रायडर ठरले.फेडरेशन आॅफ मोटार स्पोर्टस क्लब्ज आॅफ इंडिया अधिकृत मोटार ...

कोल्हापूर : वेड्यावाकड्या आणि निसरड्या वळणांवर वाऱ्याच्या वेगाने धावणाºया दुचाकींचा आवाज, आबालवृद्ध प्रेक्षकांचा उत्साह यांच्या साथीने शेंडा पार्क येथील खुल्या मैदानात डर्ट ट्रॅक स्पर्धा झाली. यामध्ये देशभरातील ७० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेत पिंकेश ठक्कर, युवराज कोंडेदेशमुख बेस्ट रायडर ठरले.फेडरेशन आॅफ मोटार स्पोर्टस क्लब्ज आॅफ इंडिया अधिकृत मोटार रेसिंग संघटनेशी संलग्न कोल्हापूर मोटार स्पोर्टसने या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेमध्ये देशीसह विदेशी गाड्यांचा व त्यावरील मोटारसायकलपटूंचा थरार प्रेक्षकांना अनुभवता आला. ही स्पर्धा रेसिंग चाहत्यांसाठी पर्वणीच ठरली. आबालवृद्धांनी स्पर्धा पाहण्यासाठी गर्दी केली होती. स्पर्धा एकूण १३ गटांत घेतली. निकाल पुढीलप्रमाणे : परदेशी खुला गट- युवराज कोंडेदेशमुख, सुनील मोहिते (पुणे), इक्शान शानभाग (सातारा), रॉयल इन्फिल्ड ३५० गट- हितेश घाटगे, आशितोष शिवलकर (पुणे), ओंकार बुधले (कोल्हापूर). नोव्हीस गट- शिवम कांबळे, विश्वविजय कांबळे (कोल्हापूर), कुणाल जोगवाडे (पुणे). स्कूटर गट- पिंकेश ठक्कर (पुणे), अनिकेत कुमकेकर (सांगली), नीरज वांजळे. रॉयल इन्फिल्ड ५०० सीसी. गट- सोहल अहमद (बंगलोर), सचिन घोरपडे, स्वागत खांडेकर (कोल्हापूर). रॉयल इन्फिल्ड हिमालयीन गट- सोहल अहमद (बंगलोर), प्रियंश के. समीर शेख. महाराष्ट्र गट- पिंकेश ठक्कर, विश्वविजय कांबळे, कुणाल जोगवाडे. बॅरल एक्झॉस्ट गट- सोहल अहमद, सचिन घोरपडे, प्रियेश. टू स्ट्रोक ओपन- सोहेल अहमद, पिंकेश ठक्कर, सुनील मोहिते, किड्स ओपन - युवराज कोंडेदेशमुख (पुणे), इक्शान शानभाग (सातारा), जिनेंद्र सांगवे (अब्दुललाट). फोर स्ट्रोक खुला गट- सोहेल अहमद, पिंकेश ठक्कर, सचिन घोरपडे. आर. ई. खुला गट- सोहेल अहमद, ओंकार बुधले, प्रियंश. एक्सपर्ट गट - पिंकेश ठक्कर, स्वागत खांडेकर, सुनील मोहिते यांचा समावेश आहे.यावेळी पुणे मोटार स्पोर्टसचे विक्रांत राऊत, अन्वर शेख, रचना नंदा, रॉयल रायडर्सचे जयदीप पवार, अभिजित काशीद, बॅरल एक्झॉस्टचे ओंकार बुधले, ‘अ‍ॅस्टर आधार’चे चिन्मय ठक्कर, आदी उपस्थित होते.‘बेस्ट रायडर’ म्हणून युवराज कोंडेदेशमुख (परदेशी बनावटी गट), पिंकेश ठक्कर (इंडियन एक्स्पर्ट गट) यांचा गौरव करण्यात आला. यात कोल्हापुरातील अब्दुललाटचा छोटा रायडर जुनेंद्र सांगावे व इक्शान शानभाग (सातारा) यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.