शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

‘टू के प्रिंट’ तंत्रज्ञानाने सजलेला 'पिंजरा' प्रदर्शित

By admin | Updated: March 19, 2016 00:24 IST

प्रेक्षकांचा उत्स्फू र्त प्रतिसाद : ४४ वर्षांनंतरही मास्तरांची जादू कायम

कोल्हापूर : अभिजात कलाकृती अनेक वर्षांनंतरही टवटवीत आणि स्मरणात राहतात. ७० च्या दशकात आलेल्या व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘पिंजरा’ चित्रपटाने रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. आता नव्या ‘टू के प्रिंट’च्या साजात प्रदर्शित झालेल्या ‘पिंजरा’ चित्रपटाला शुक्रवारी कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, संध्या यांचा दमदार अभिनय, राम कदम यांचे बहारदार संगीत, जगदिश खेबुडकर यांची गीते आणि व्ही. शांताराम यांच्या दिग्दर्शनाने सजलेला ‘पिंजरा’ म्हणजे मराठी चिपटसृष्टीतील अभिजात कलाकृती. काळ बदलला तरी या कलाकृतीचे महत्त्व कमी झाले नाही. त्यामुळेच व्ही. शांताराम प्रॉडक्शनतर्फे तांत्रिक बदल आणि डिजिटलायझेशन करून हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणला आहे. ४४ वर्षांनंतरही मास्तरांची जादू कायम असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. ३१ मार्च १९७२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या मूळ प्रिंटचे अद्ययावत अशा ‘टू के प्रिंट’मध्ये रूपांतर करण्यात आले आहे. आॅडिओ, कलर ग्रेडिंग, आॅडिओ रिस्टोरेशन आदी विविध प्रक्रिया करून चित्रपटाचे ध्वनी, चित्र आणि प्रिंटमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या दृश्यदर्जात सुधारणा झाली आहे. कलर करेक्शन प्रक्रियेमुळे रंगसंगतीही अधिक आकर्षक झाली आहे. या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. खेबुडकर यांचे आशयपूर्ण शब्द आणि राम कदम यांच्या अस्सल मराठमोळ्या चालींना संगीतकार अविनाश-विश्वजित यांनी अद्ययावत वाद्यवृंदासह आधुनिक पार्श्वसंगीताचा नवा मुलामा दिला आहे. डॉल्बी साऊंड सिस्टीममुळे सुस्पष्टता आली आहे. मराठी चित्रपट-सृष्टीतील ‘माईलस्टोन’ ठरलेल्या ‘पिंजरा’ या चित्रपटाची जादू आज नव्याने अनुभवायला मिळाली. मराठी भाषेला प्राधान्य म्हणून मी आज हा चित्रपट पाहिला. - सारिका बनगे, कोल्हापूरमी हा चित्रपट तब्बल २२ वेळा पाहिला आहे; पण आज नव्या ढंगात पाहिल्याचा आनंद काही औरच होता. मराठीतल्या अनेक दर्जेदार कलाकृतींवरही असे प्रयोग व्हायला हवेत. पिंजरा पाहण्यासाठी नेर्ले (ता. शाहूवाडी) येथून आम्ही ४४ जण कोल्हापूरला आलो होतो. - बी. एन. पाटील, नेर्ले, ता. शाहूवाडी