शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फुलेवाडी^-पीटीएम आज झुंजणार

By admin | Updated: April 12, 2017 01:28 IST

‘फुलेवाडी’ची ‘प्रॅक्टिस’वर मात: नेताजी चषक फुटबॉल स्पर्धा

कोल्हापूर : नेताजी चषक फुटबॉल स्पर्धेतील मंगळवारी झालेल्या अत्यंत चुरशीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’वर २-१ अशा गोलफरकाने मात करीत अंतिम सामन्यात धडक मारली. आज, बुधवारी फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ विरुद्ध पीटीएम ‘अ’ यांच्यामध्ये अंतिम लढत होणार आहे. शाहू स्टेडियमवर दुसरा उपांत्य फेरीतील सामना पाहण्यासाठी फुटबॉल शौकिनांनी मोठी गर्दी केली होती. दोन्ही संघांनी सामन्याच्या पहिल्या मिनिटापासूनच खाते उघडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. यामध्ये प्रॅक्टिस फुटबॉल क्लबकडून झालेल्या खोलवर चढाईमध्ये शकील पटेलने मारलेले चेंडू फुलेवाडीचा गोलरक्षक निखिल खाडेने उत्कृष्टरीत्या बाहेर काढल्याने त्यांची संधी हुकली. पुढच्या मिनिटाला फुलेवाडी संघाकडून रोहित मंडलिकच्या पासवर जयसन वाझची संधी हुकली. ४० व्या मिनिटाला सूरज शिंगटेच्या पासवर तेजस जाधवने गोल करीत संघाचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ १-० अशा गोलफरकाने आघाडीवर होते. उत्तरार्धात अत्यंत वेगवान झालेल्या सामन्यात ४७ व्या मिनिटाला फुलेवाडी संघाच्या तेजस जाधवच्या पासवर जयसन वाझने अचूक गोल करीत सामन्यात २-० अशी आघाडी घेतली. या गोलनंतर फुलेवाडी संघाने थोडी बचावात्मक खेळी करण्यास सुरुवात केली. प्रॅक्टिस संघाने याचा फायदा घेत जोरदार खोलवर चढाया करण्यास सुरुवात केली. यामध्ये सागर चिले, इंद्रजित मोंडल, शकील पटेल, राहुल पाटील यांच्या आक्रमक खेळीमुळे फुलेवाडी संघातील बचावफळीतील खेळाडूंची दमछाक झाली. ७४ व्या मिनिटाला प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या इंद्रजित मोंडलने गोल करीत संघाचे खाते उघडले. या गोलनंतर प्रॅक्टिस संघाचा आत्मविश्वास वाढला. त्यांनी आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली. यामध्ये सागर चिले, संदीप पोवारची संधी हुकली. प्रॅक्टिस संघाला ही आघाडी कमी न करता आल्याने ‘फुलेवाडी’ संघाने २-१ अशा गोलफरकाने विजय मिळविला. पुन्हा हुल्लडबाजी....प्रॅक्टिस-फुलेवाडी यांच्यातील उपांत्य सामना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात फुटबॉल शौकि नांनी गर्दी केली होती. या सामन्यातही पंचांच्या काही निर्णयांवर संघाचे समर्थक पंचांना अर्वाच्च शिवीगाळ करीत होते. ही शिवीगाळ सुरू राहिल्याने पोलिसांनी प्रेक्षक गॅलरीत धाव घेताच या समर्थकांनी पळ काढला. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे पाहून या हुल्लडबाजांवर कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांमधून होत आहे.शाहू स्टेडियमवर नेताजी चषक फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात मंगळवारी झालेल्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात फुलेवाडीच्या खेळाडूंनी मारलेला चेंडू ‘प्रॅक्टिस’चा गोलरक्षक अल्फाज हकीमने उत्कृ ष्टरीत्या बाहेर काढला.