शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णविवराचे छायाचित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:31 IST

डॉ. व्ही. एन. शिंदे क्षणाक्षणाला सेल्फी काढायच्या आणि सोशल मीडियावर टाकायच्या जमान्यात सर्व प्रमुख वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठावर कृष्णविवराच्या छायाचित्राला स्थान ...

डॉ. व्ही. एन. शिंदेक्षणाक्षणाला सेल्फी काढायच्या आणि सोशल मीडियावर टाकायच्या जमान्यात सर्व प्रमुख वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठावर कृष्णविवराच्या छायाचित्राला स्थान मिळाले. काय आहे या छायाचित्राचे एवढे महत्त्व? हा प्रश्न मनात येणे सहज शक्य आहे. कृष्णविवरे आहेत, चांगले टेलिस्कोप आहेत, आधुनिक छायाचित्रे टिपणारे तंत्रज्ञान आहे, तरीही या छायाचित्राला एवढे महत्त्व मिळाले. कारण हे तितकेच दुर्मीळ छायाचित्र आहे. ते मिळविण्यासाठी जगभरातील कित्येक वर्षे शेकडो संशोधक प्रयत्न करत होते. शेवटी कृष्णविवराचे देखणे छायाचित्र २०१९ मध्ये मिळाले.कृष्णविवर हे ताऱ्याचे अंतिम रूप आहे. ती कोणत्याही ताºयाची अंतिम अवस्था असते. एका विशिष्ट ताºयाचे आयुष्य संपते तेव्हा कृष्णविवर तयार होते. सर्व तारे अणुंचे बनलेले आहेत. अणूच्या केंद्रस्थानी प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स असतात. केंद्रकाभोवती विविध कक्षामध्ये इलेक्ट्रॉन्स फिरतात. हे इलेक्ट्रॉन दोन अणूंमध्ये अंतर राखण्यास मदत करतात. या ताऱ्यांमध्ये आण्विक शृ्रंखला प्रक्रिया सुरू असते. त्यातून प्रचंड ऊर्जा तयार होते. तीच प्रकाशाच्या रूपात आपल्यापर्यंत पोहोचत असते.अखेर ताºयांतील सर्व हायड्रोजन ज्वलन होऊन संपतो. त्यानंतर त्यापासून तयार झालेल्या हेलियमचे ज्वलन सुरू होते. हेलियमही संपतो तेव्हा ताºयाचा इतर भाग केंद्रकाकडे खेचला जातो. तारा जितका मोठा असेल तितके त्याचे आयुष्य कमी असते. जेव्हा ताºयाचे आयुष्य संपते तेव्हा त्यात प्रचंड घडामोडी होतात. त्याचे सर्व वस्तुमान केंद्राकडे जाते. अणू केंद्रकाच्या बंधनातून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात आणि त्याचे आकारमान खूप कमी होते. मात्र, वस्तुमान तसेच राहते. परिणामी, त्याचे गुरुत्वाकर्षण प्रचंड वाढते. ते इतके जास्त असते की, त्यापासून प्रकाशही सुटू शकत नाही. जे त्याच्या कक्षेत जाते ते सर्व आत शोषले जाते. बाहेर काहीच येत नाही. म्हणूनच त्याला ‘कृष्णविवर’ असे म्हणतात. अमर्याद लहान आणि कमालीचे जड.या अवस्थेत भौतिकशास्त्राचे नियम लागू होत नाहीत. या बिंदूभोवती एक मर्यादा असते. ही मर्यादा ओलांडून आत गेलेले काहीच परत येत नाही. त्यामुळे हे प्रकरण आहे काय? याचा पुरेसा अंदाज कोणालाच नाही. या मर्यादेचे उल्लंघन केल्यानंतर प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने वस्तू केंद्रकाकडे जाते. सूर्यापेक्षा तिप्पट मोठ्या ताºयाचे कृष्णविवरात रूपांतर होते, असे भारतीय वंशाचे संशोधक चंद्रशेखर यांनी शोधले. प्रकाशदेखील जेव्हा बाहेर पडू शकत नाही तेव्हा हे कृष्णविवर आपण पाहू शकत नाही. मात्र, हॉकिंग यांना ‘अशा कृष्णविवरात गेल्यास परत येता येणार नाही. मात्र, आपण नव्याच विश्वात प्रवेश करू’, असे वाटत होते. कृष्णविवरातील माहिती अनेक गोष्टींचा उलगडा करेल, असे ते म्हणत. कृष्णविवरे ही आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असावीत, असे संशोधकांचे मत आहे. आकाशातील असंख्य तारे अशा कृष्णविवराभोवती फेºया मारत आहेत.क्षकिरणांच्या शोधानंतर अशा कृष्णविवरांचे अस्तित्व संशोधकांनी मान्य केले. एखादा तारा कृष्णविवराच्या जवळ गेल्यास तो आत जाताना अवकाशात असे क्षकिरण तयार करतात. अशा गूढ कृष्णविवराचे छायाचित्र असल्याने त्याची बातमी झाली नसती तरच नवल.(लेखक विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचे अभ्यासक आणि शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव आहेत.)