शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारणार : कुलगुरू डॉ. शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 18:43 IST

शिवाजी विद्यापीठात कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्याचा आपला मनोदय असून साहित्य, साहाय्य आणि प्रशिक्षण अशा तिहेरी स्वरूपाची भूमिका या केंद्राच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठ बजावेल, अशी माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शनिवारी दिली.

ठळक मुद्देविद्यापीठात कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारणार : कुलगुरू डॉ. शिंदेसांगली, कुरुंदवाडच्या चार महाविद्यालयांची केली पाहणी

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्याचा आपला मनोदय असून साहित्य, साहाय्य आणि प्रशिक्षण अशा तिहेरी स्वरूपाची भूमिका या केंद्राच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठ बजावेल, अशी माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शनिवारी दिली.महापूरग्रस्त झालेल्या सांगली आणि कुरुंदवाड येथील महाविद्यालयांना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी कुलगुरू शिंदे म्हणाले, कोल्हापूर, सांगली परिसरांत आलेल्या अभूतपूर्व महापुरामुळे विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या सुमारे दहा महाविद्यालयांचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून त्या महाविद्यालयांना मी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करीत आहे. या महाविद्यालयांना विद्यापीठाच्या स्तरावरून नेमकी कशा स्वरूपाची मदत करता येईल, याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी या संदर्भातील विषय व्यवस्थापन परिषदेसमोर मांडण्यात येईल.सांगली येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, मथुबाई गरवारे महाविद्यालय आणि कुरुंदवाड येथील स. का. पाटील महाविद्यालय या चार महाविद्यालयांना त्यांंनी भेटी दिल्या.यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, व्यवस्थापन परिषद सदस्य अ‍ॅड. धैर्यशील पाटील, डॉ. डी. जी. कणसे, डॉ. सी. टी. कारंडे, अधिसभा सदस्य संजय परमणे, विशाल गायकवाड, विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड, डॉ. संजय ठिगळे, प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील, डॉ. बी. व्ही. ताम्हणकर यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, एन.एस.एस. व एन.सी.सी.चे समन्वयक उपस्थित होते. 

देवानंद शिंदे गहिवरले...महाविद्यालयांच्या भिंतींवर महापुराच्या दहा-बारा फूट उंचीच्या तांबड्या-करड्या ओलेत्या खुणा... फरशांवर, जमिनीवर मातकट चिखलाचा थर... वर्गखोल्यांतील भिजून मोडलेले बेंच... कार्यालयीन साहित्याचे झालेले प्रचंड नुकसान... प्रयोगशाळांतील साहित्याची झालेली प्रचंड नासधूस... ग्रंथालयांतील कपाटांमध्ये अक्षरश: कुजलेली दुर्मीळ पुस्तकं... परिसरात सर्वत्र भरून राहिलेला कुजट, कुबट वास... अशी काळजाला पिळवटून टाकणारी दृश्ये पाहून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना गहिवरून आले. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठKolhapur Floodकोल्हापूर पूर