शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

नसबंदीसाठी महापालिकेचे कायमस्वरूपी केंद -आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती ,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:50 IST

चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीसाठी महापालिका कायमस्वरूपी केंद्र उभारणार आहे. त्याचबरोबर नसबंदी शस्त्रक्रियांची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी डॉक्टरांचे पॅनेल तयार केले असून, तीन आठवड्यांत हे केंद्र कार्यान्वित होईल, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय पाटील यांनी दिली.गेली पाच दिवस ‘लोकमत’मध्ये सुरू असलेल्या ‘कुत्र्यांचा जोर.... नागरिकांना घोर...’ ...

ठळक मुद्देतीन आठवड्यांत सुरू होणार; दररोज २० शस्त्रक्रियांचे लक्ष्य ्र

चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीसाठी महापालिका कायमस्वरूपी केंद्र उभारणार आहे. त्याचबरोबर नसबंदी शस्त्रक्रियांची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी डॉक्टरांचे पॅनेल तयार केले असून, तीन आठवड्यांत हे केंद्र कार्यान्वित होईल, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय पाटील यांनी दिली.

गेली पाच दिवस ‘लोकमत’मध्ये सुरू असलेल्या ‘कुत्र्यांचा जोर.... नागरिकांना घोर...’ या वृत्तमालिकेच्या पार्श्वभूमीवर  डॉ. पाटील बोलत होते. ते म्हणाले, सध्या जीवरक्षा अ‍ॅनिमल वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्यात येत आहे. यासाठी महापालिकेच्या डॉग व्हॅनमार्फत कुत्री पकडून दिली जात आहेत. आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे हे केंद्र सध्या सुरू आहे. त्याच ठिकाणी महापलिका मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीसाठी कायमस्वरूपी केंद्र उभारणार आहे.

आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या मान्यतेनुसार डॉ. वरुण धूप व डॉ. संतोष वाळवेकर यांचे एक पॅनेल तयार केले आहे. या दोघा डॉक्टरांनी रोज किमान दहा कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करायची आहे. त्यांना प्रत्येक शस्त्रक्रियेमागे २५० रुपये दिले जाणार आहेत. जीवरक्षा ट्रस्टमार्फत १० आणि महापालिकेच्या यंत्रणेमार्फत १० अशा दररोज सरासरी २० कुत्र्यांची नसबंदी करण्याच्या शस्त्रक्रिया करण्याचे लक्ष्य आहे.जाराट उचलण्यासाठी खास गाडीशहरातील मटण, चिकनची दुकाने, हॉटेलच्या परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या जादा आहे. या दुकानांतील कचरा (जाराट) तेथील जवळच्याच कचरा कोंडाळ्यात किंवा गटारीत टाकला जातो. त्यामुळे ही कुत्री त्या ठिकाणी कळपाने राहतात. माणसांवर हल्ले करतात. त्यांच्या उपजीविकेचे हे साधनच बंद व्हावे यासाठी हे जाराट गोळा करण्यासाठी एक स्वतंत्र वाहन (गाडी ) देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत त्यासाठी निधी मंजूर झाला आहे. लवकरच ही गाडी सुरू होईल, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.कमी मानधनात तयारीभटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी करण्यासारख्या सामाजिक उपक्रमांत आपले योगदान राहावे म्हणून डॉ. वरुण धूप व डॉ. संतोष वाळवेकर यांनी प्रत्येक शस्त्रक्रियेमागे २५० रुपये इतक्या कमी मानधनात काम करण्यास मान्यता दिली आहे. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच प्रशासनाकडून त्यांचे पॅनेल तयार केले आहे. अन्य शहरांत निर्बीजीकरणासाठी किमान दोन हजार रुपये खर्च येतो, असेही त्यांनी सांगितले.महापालिकेची २५ लाखांची तरतूद‘भटक्या कुत्र्यांचे नर्बीजीकरण व लसीकरण करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने या वर्षीच्या अंदाजपत्रकात २५ लाखांची तरतूद केली आहे; त्यामुळे पैसे नाहीत म्हणून हे काम थांबणार नाही, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.       ( समाप्त)

टॅग्स :dogकुत्राgovernment schemeसरकारी योजना