शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ स्थायी सभा तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 13:16 IST

कोल्हापूर शहरात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ बुधवारी स्थायी समिती सभा तहकूब करण्यात आली. जर सुरळीत पाणीपुरवठा होणार नसेल, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू का, असा संतप्त सवाल पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना सदस्यांनी विचारला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती शारंगधर देशमुख होते.

ठळक मुद्देअपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ स्थायी सभा तहकूब पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना सदस्यांनी विचारला संतप्त सवाल

कोल्हापूर : शहरात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ बुधवारी स्थायी समिती सभा तहकूब करण्यात आली. जर सुरळीत पाणीपुरवठा होणार नसेल, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू का, असा संतप्त सवाल पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना सदस्यांनी विचारला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती शारंगधर देशमुख होते.राजारामपुरी प्रभागात १५ दिवसांपासून कमी दाबाने पाणी येत आहे. शाहूपुरीत पाच दिवस पाणी नाही. उपसा वारंवार बंद पडत आहे. फोन केला, तर कारणे सांगितली जातात. आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करायचे का? अशा शब्दांत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला.

लेव्हलसाठी पाणी वारंवार पत्रव्यवहार करूनही सोडले जात नसेल, तर पाटबंधारे विभागाची सोमवारी वेळ घ्या. त्यांच्या कार्यालयात जाऊन बसू, असा इशारा संदीप कवाळे, संजय मोहिते, पूजा नाईकनवरे यांनी दिला.पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी झालेली असल्याने त्याचा परिणाम पाणी उपसावर होत आहे. याबाबत पाटबंधारे विभागास पाणी सोडण्याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. पुईखडी येथून कमी दाबाने पाणी येत आहे. शिंगणापूर बंधारा लिकेज दुरुस्तीकरिता आठ-१0 तास लागणार आहेत; यासाठी दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवावा लागेल, अशी माहिती प्रशासनाने दिली.शिंगणापूर व आपटेनगर येथील पाणी उपसा करण्यात येणाऱ्या मोटरच्या मुदती संपलेल्या आहेत. त्या बदलण्याचे नियोजन करा, अशी सूचना राजाराम गायकवाड यांनी केली. बजेटमध्ये रक्कम २२ लाखांची तरतूद केली आहे. त्याप्रमाणे नवीन पंप बसविण्यात येतील, असे सांगण्यात आले.

 

टॅग्स :WaterपाणीMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर