शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
5
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
6
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
7
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
8
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
9
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
10
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
11
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
12
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
13
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
14
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
15
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
16
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
17
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
19
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
20
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक

Maharashtra Assembly Election 2019 (18062) जिल्ह्याबाहेरील तीन निकालांकडे लोकांचे लक्ष -कोथरूडबद्दल उत्सुकता : मुंबईतही दोन उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 12:49 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहेच; परंतु त्याशिवाय कोथरूड (पुणे)मध्ये पालकमंत्री चंद्रकांत ...

ठळक मुद्देप्रमुख पक्षांनी ‘मनसे’च्या किशोर शिंदे या एकच उमेदवारास ताकद दिली आहे; परंतु

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहेच; परंतु त्याशिवाय कोथरूड (पुणे)मध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अंधेरी (पूर्व)मधून शिवसेनेकडून रमेश लटके व विलेपार्लेमधून काँग्रेसकडून अशोक जाधव हे रिंगणात आहेत. त्यामुळे या तिघांच्या निकालाकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

पालकमंत्री पाटील हे पुणे पदवीधर मतदारसंघाचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीत ते कधीच लढलेले नाहीत; परंतु राज्याचे राजकारण करणाऱ्या नेतृत्वाने जनतेतून निवडून आले पाहिजे, असा आग्रह पक्षाने धरल्याने त्यांना विधानसभेच्या थेट मैदानात उतरावे लागले. सुरुवातीला ते कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर उत्तर, चंदगड किंवा राधानगरी मतदारसंघातून लढतील असे चित्र होते; परंतु निवडणूक लागल्यावर अचानक त्यांच्या नावांची भाजपने कोथरूडमधून घोषणा केली. सुरुवातीला तिथेही बरेच नाराजीनाट्य घडले. त्यांच्याविरोधात प्रमुख पक्षांनी ‘मनसे’च्या किशोर शिंदे या एकच उमेदवारास ताकद दिली आहे; परंतु तरीही हा भाजपचा गड असल्याने तेथून पालकमंत्री पाटील निवडून येण्यात अडचण दिसत नाही.

रमेश कोंडीराम लटके हे मूळचे शाहूवाडी तालुक्यातील शेंबवणेपैकी धुमकवाडीचे आहेत. ते तीन वेळा नगरसेवक होते. रोजगाराच्या शोधात त्यांचे वडील मुंबईला गेले व तिथे गिरणी कामगार झाले. त्यांची आई आजही अंधेरी मार्केटमध्ये भाजीविक्रीचे काम करतात. शिवाय त्यांचा फुलांचा व्यापार आहे. यावेळेलाही त्यांचा विजय होईल, असे चित्र आहे.मूळचे कोलोली (ता. पन्हाळा) येथील माजी आमदार अशोक भाऊसाहेब जाधव हे विलेपार्ले मतदारसंघांतून तिसऱ्यांदा नशीब अजमावत आहेत. त्यांचे वडीलही नोकरीच्या शोधात मुंबईला गेले व त्यांनी तिथेच चांगले बस्तान बसविले. त्यामुळे पन्हाळा तालुक्यातील लोकांचे या निकालाकडे लक्ष आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकElectionनिवडणूक