शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

प्रलंबित निकाल आठवड्याभरात

By admin | Updated: July 11, 2015 00:05 IST

कुलगुरूंची ग्वाही : सर्वपक्षीय विद्यार्थी कृती समितीकडून निकालांबद्दल तक्रारींचा पाढा

कोल्हापूर : निकाल लांबले असल्याचे मान्य आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे निकाल उशिरा लागत आहेत. विद्यार्थी हित लक्षात घेऊन निकाल लवकर लावण्याची कार्यवाही सुरू आहे. प्रलंबित विद्यार्थ्यांचे निकाल आठवड्याभरात लावले जातील तसेच शिवाजी विद्यापीठातील प्रवेशाची मुदत वाढविण्यात येईल, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय विद्यार्थी कृती समितीला दिली.प्रलंबित निकाल, निकालातील त्रुटी, विद्यापीठाच्या विविध विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना मिळणारी त्रासदायक वागणूक अशा विविध स्वरूपांतील तक्रारींचा पाढा सर्वपक्षीय कृती समितीने कुलगुरू डॉ. शिंदे यांच्यासमोर वाचला. निकाल प्रलंबित असल्याने अन्य विद्यापीठांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे अशक्य होत आहे. संकेतस्थळावर पहिल्या दिवशी निकाल उत्तीर्ण, तर दुसऱ्या दिवशी अनुत्तीर्ण असा दिसतो. निकाल, यातील त्रुटींबाबत विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे विचारणा केल्यास त्यांच्याकडून टाळाटाळ होते, अशा विविध तक्रारी विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकारी, विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. शिंदे यांच्यासमोर मांडल्या. तक्रारी समजून घेतल्यानंतर निकाल उशिरा लागण्याबाबतच्या अडचणी कुलगुरू डॉ. शिंदे यांनी संबंधितांना सांगितल्या. ते म्हणाले, प्रलंबित निकाल येत्या आठवड्याभरात लावले जातील. त्यादृष्टीने यंत्रणा कार्यान्वित केली आहे. निकाल लांबल्याने आढावा घेऊन विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेशाची मुदत वाढविली जाईल. कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेशापासून वंचित ठेवले जाणार नाही. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)निकाल देतो मागील डाटा आणा...अंतिम वर्षाची मागणी केली असताना गेल्या दोन वर्षांच्या गुणांच्या डाटाची मागणी केली जात असल्याची तक्रार वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षाची परीक्षा दिलेल्या दिव्या माळी हिने कुलगुरूंकडे केली. ती म्हणाली, अन्य विद्यापीठ, संस्थांमध्ये प्रवेशासाठी गुणपत्रिकेची मागणी केली जाते. नेटवर निकाल बघितल्यानंतर गुणपत्रिकेची मूळप्रत मागण्यासाठी गेल्यावर मागील दोन वर्षांच्या गुणांच्या डाटाची विद्यापीठाकडून मागणी होत आहे. ते चुकीचे असून, ऐनवेळी डाटा कुठून आणणार, असा सवाल तिने उपस्थित केला.कोण, काय म्हणाले...चांगले गुण असूनही निव्वळ गुणपत्रिका मिळाली नसल्याने, त्यातील त्रुटींमुळे प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे.- श्वेता परूळेकर, सचिव, विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळतांत्रिक चुकांचा विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये. अशा चुका करणाऱ्यांसह कामचुकारपणा करणारे प्राध्यापक व कर्मचाऱ्यांवर विद्यापीठाने कारवाई करावी.- भारत घोडके, जिल्हा उपाध्यक्ष, एनएसयुआयनिकालात अनेक चुका आहेत. त्या त्वरित सुधारित करून दिल्या जात नसल्याने विद्यार्थ्यांना त्रास होत आहे.- अवधूत अपराध, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस