शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बंदी असताना प्लास्टिक पिशव्या विकणाऱ्या व्यापाऱ्यांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 11:40 IST

प्लास्टिकमुक्त शहर करण्याच्या महापालिकेच्या संकल्पाबाबत गेल्या महिन्याभरापासून जनजागृती केली जात आहे. आता बुधवारपासून शहरात प्लास्टिक विकण्यास बंदी केल्यामुळे यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही. प्लास्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी दोन विक्रेत्यांना दंड करण्यात आला. आज, गुरुवारपासून ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देबंदी असताना प्लास्टिक पिशव्या विकणाऱ्या व्यापाऱ्यांना दंडमहापालिका प्रशासनाची कारवाई, दहा हजार दंड वसूल

कोल्हापूर : प्लास्टिकमुक्त शहर करण्याच्या महापालिकेच्या संकल्पाबाबत गेल्या महिन्याभरापासून जनजागृती केली जात आहे. आता बुधवारपासून शहरात प्लास्टिक विकण्यास बंदी केल्यामुळे यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही. प्लास्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी दोन विक्रेत्यांना दंड करण्यात आला. आज, गुरुवारपासून ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.केंद्रशासनाने गांधी जयंतीपासून देशात प्लास्टिकबंदी केली आहे. राज्य शासनानेही यापूर्वीच प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या वतीने याची अंमलबजावणी सुरू आहे. केंद्रशासनाच्या आदेशानुसार आता ही कारवाईची मोहीम आणखीन तीव्र करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून बुधवारी या मोहिमेअंतर्गत शिवाजी चौक येथील अंबिका स्वीट्स व जोतिबा रोड लक्ष्मी मंदिर येथील गजलक्ष्मी साडी सेंटर यांच्यावर प्लास्टिकविरोधी पथकाने कारवाई करून प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे दंड वसूल केला.महानगरपालिका आरोग्य विभागाने प्लास्टिक विक्रीला आळा घालण्याकरिता ११ पथके स्थापन केली असून, रोज सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ही पथके अचानक दुकाने, कारखाने यांची तपासणी करणार आहेत. एकदा कारवाई झाल्यानंतर तोच विक्रेता पुन्हा सापडला, तर त्याच्यावर पाच, १0, १५ हजार रुपये असा दंड केला जाणार आहे. या कारवाईचे रेकॉर्ड तयार केले जाणार आहे.प्लास्टिकचा वापर टाळाकेंद्र तसेच राज्यसरकारच्या निर्णयानुसार कोल्हापूर शहरात याची अंमलबजावणी कडक केली जाणार आहे; त्यामुळे नागरिक, दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांनी प्लास्टिकचा वापर टाळावा. यापुढे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे; त्यामुळे प्लास्टिक शक्यतो कापडी पिशव्यांचा तसेच पर्यायी साधनांचा वापर करावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.

 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर