वन्य जिवांकडून होणाऱ्या पिकांच्या नुकसानभरपाईत वन्यखात्याने वाढ केली असून शासनाने नुकसानभरपाईची रक्कम वाढवली आहे. यापूर्वी पिकाच्या नुकसानीस प्रतिगुंठा २० रुपये मदत करून शेतकऱ्यांची जणू चेष्टाच केली जात असे. त्यामुळे नुकसानीबाबत शासनाच्या नियामानुसार शेतकरी हतबल होत होते. अनेक वर्षांपासून वन्यप्राण्यांद्वारे होणाऱ्या पिकांची नुकसानभरपाई वाढवावी, अशी मागणी राज्यभरातील शेतकऱ्यांकडून केली जात होती. कोल्हापूर जिल्ह्यात आजरा, चंदगड, गडहिंग्लज आणि राधानगरी आदी तालुक्यात अशा वन्यप्राण्यांपासून शेतीचे अतोनात नुकसान होते, पण शेतकऱ्याच्या हाती तोकडी शासकीय मदत पडते. शासनाने आता रक्कम वाढवली असली तरी याबाबत शेतकऱ्यांकडून पूर्वीपेक्षा बरी अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. याशिवाय नुकसान करणाऱ्या प्राण्यांच्या यादीत आता माकड, गिधाड, गवा रेडा या प्राण्यांचाही समावेश करण्यात आला आहे. या प्राण्यांनी पिकांचे नुकसान केल्यास वनखाते आर्थिक मदत करणार आहे.नुकसान व त्याची भरपाई २ हजारपर्यंत नुकसान झाल्यास : पूर्ण परंतु किमान रु. ५००२ हजार ते १० हजारपर्यंत नुकसानीच्या ५० टक्के, कमाल सहा हजार रु.१० हजारापेक्षा अधिक उसाचे नुकसान : नुकसानीच्या ३० टक्के,कमाल १५ हजार रु. प्रति टन ४०० रु.हल्ल्यातील जखमींना मदत : व्यक्ती मृत्यू पावल्यास अथवा कायमचे अपंगत्व आल्यास : २ लाख रुपये.किरकोळ जखमी झाल्यास : रु. ५०,०००/-किरकोळ जखमी : औषधोपचाराचा खर्च मिळणार, खासगी रुग्णालयात उपचार झाल्यास ७,५०० रु. देणार.फळबागांच्या नुकसानीसाठी मदत : पूर्वी हत्तीपासून होणाऱ्या फळबागांच्या नुकसानीसाठी मदत मिळत होती. आता नव्याने रानगव्यांपासूनच्या नुकसानीची भरपाई मिळणार आहे. ती भरपाई प्रती झाड पुढीलप्रमाणे :नारळ : २००० रु., सुपारी : १,२०० रु., कलमी आंबा : १,६०० रु., केळी : ४८ रु., इतर फळझाडे : २०० रु.
पीक नुकसान- भरपाईत वाढ
By admin | Updated: January 13, 2015 00:10 IST