शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-ताराराणीत खासगी सावकारांचा भरणा

By admin | Updated: October 22, 2015 00:51 IST

मुश्रीफ यांची टीका : सदर बाजार येथे प्रचारसभा

कोल्हापूर : भाजप-ताराराणी महायुतीमध्ये खासगी सावकारी करणारे तसेच क्लबमध्ये पत्ते कुटणाऱ्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे जनता त्यांना कधीही साथ देणार नाही, अशी टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. सदर बाजार, सर्किट हाऊस, शाहू कॉलेज या प्रभागांतील राष्ट्रवादी काँग्रेस, मित्रपक्ष उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. आमदार मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या पाच वर्षांत सदर बाजार परिसरासह शहरात केलेल्या विकासकामांमुळे जनता नक्कीच साथ देईल. आगामी काळातही परिसराचा विकास करण्यास आम्ही कटिबद्ध आहे. बारा वर्षांच्या कालावधीमध्ये लाखो लोकांची मोफत आॅपरेशन शासनाच्या निधीतून करून दिली आहेत. तुमच्या सुख-दु:खात सहभागी होणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले. राजेश लाटकर यांनी प्रभागातील रस्ते, वीज, पाणी, स्वच्छता आदी पायाभूत सुविधा सर्वसामान्यांना उपलब्ध करून देऊन सदर बाजार परिसराचा कायापालट केला असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले. प्रा. जयंत पाटील म्हणाले, ताराराणी आघाडीच्या म्होरक्यांना कोल्हापूरची जनता ओळखून आहे. या निवडणुकीत त्यांना जनता जागा दाखवून देईल. राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य आघाडीच ‘नंबर वन’ राहील, असा विश्वासही व्यक्त केला. राजेश लाटकर म्हणाले, सदर बाजार, विचारे माळ परिसरातील सर्व प्रश्न महापालिकेत मांडून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. स्नेहल जाधव, अन्वरबी शेख, सूरमंजिरी लाटकर, शिक्षण मंडळ सभापती महेश जाधव, महंमद पठाण, झाकीर कुरणे आदी उपस्थित होते.