शहरं
Join us  
Trending Stories
1
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
2
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
3
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
4
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
5
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
6
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
7
ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
8
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
9
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
10
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
11
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
12
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
13
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
14
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
15
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
16
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
17
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
18
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
19
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
20
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!

पेपर तपासणीच्या दर्जाकडे लक्ष द्या

By admin | Updated: May 26, 2015 00:48 IST

‘अभाविप’ची मागणी : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांना निवेदन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे पुनर्मूल्यांकनासाठी (रिव्हॅल्युएशन) येणाऱ्या अर्जांची संख्या वर्षागणिक वाढत आहे. पेपर तपासणीबाबत विद्यार्थ्यांना अविश्वास वाटत आहे. त्यामुळे पेपर तपासणीच्या दर्जाकडे विद्यापीठाने लक्ष द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) शिष्टमंडळाने सोमवारी परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात असे म्हटले आहे की, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे काम गतिमान होत आहे. मात्र, गतिमान परीक्षा यंत्रणा राबविताना पेपर तपासणीचा दर्जा नक्की घसरला असल्याचे जाणवत आहे. गेल्या वर्षी पुनर्मूल्यांकनासाठी विद्यापीठाकडे आलेल्या अर्जांची संख्या पाहता विद्यार्थ्यांचा पेपर तपासणीबाबतचा विद्यापीठावरील विश्वास कमी होत असल्याचे दिसत आहे. केवळ अभियांत्रिकी नव्हे, तर कला, वाणिज्य आणि विज्ञानासह बहुतांश अभ्यासक्रमांच्या परीक्षांबाबत पेपर तपासणीच्या दर्जाबाबत विद्यार्थ्यांमध्ये अविश्वास निर्माण झाला आहे. हा अविश्वास दूर करण्यासाठी पेपर तपासणीच्या दर्जाकडे विद्यापीठाने लक्ष द्यावे. दरम्यान, पेपर तपासणीबाबतचा नियमाने मागोवा घेतला जाईल, असे आश्वासन परीक्षा नियंत्रक काकडे यांनी शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळात सुमित जोंधळे, अमेय गोडे, भूषण जाधव, गुरू पाटील, रतन कांबळे, चैतन्य कोठेकर, श्रीनिवास सूर्यवंशी, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)‘अभाविप’च्या विविध मागण्या अशा...प्राध्यापकांना पेपर तपासणीसाठी स्पष्ट व थेट आदेश द्यावेत.पेपर तपासणी योग्य पद्धतीने व संस्थेने न केल्यास कोणती कारवाई केली जाईल, याची माहिती द्यावी.प्राध्यापकांच्या पेपर तपासण्याच्या संख्येवर दिवसानुसार नियंत्रण असावे.प्राध्यापकांना पेपर तपासणीच्या संस्थेचा कोटा निश्चित करावा.कॅप सेंटरवर त्या परिसरातील अथवा जिल्ह्यातील पेपर तपासणीसाठी देण्यात येऊ नयेत.कॅप सेंटरवर प्रत्येक प्राध्यापकाने महाविद्यालयाच्या ओळखपत्राची फोटो कॉपी जमा करावी.