शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील यांचा मुश्रीफ यांच्यावर पलटवार, पेरणी खोळंबलेल्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 17:39 IST

राज्यातील बहुतांश जिल्हा बँकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा होऊ शकलेला नाही. राज्याचे ज्येष्ठ मंत्री म्हणून हसन मुश्रीफ यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकातून केला. कर्जमाफीची रक्कम न मिळालेल्या शेतकऱ्यांना बँका खरीप कर्ज देत नसून त्याकडे मुश्रीफ दुर्लक्ष करीत असल्याचेही त्यात म्हटले आहे.

ठळक मुद्देकर्जाविना पेरणी खोळंबलेल्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्या, चंद्रकांत पाटील यांचा मुश्रीफ यांच्यावर पलटवारकर्जमाफी न मिळालेल्यांच्या थकबाकीकडे सरकारचे दुर्लक्ष

कोल्हापूर : राज्यातील बहुतांश जिल्हा बँकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा होऊ शकलेला नाही. राज्याचे ज्येष्ठ मंत्री म्हणून हसन मुश्रीफ यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकातून केला. कर्जमाफीची रक्कम न मिळालेल्या शेतकऱ्यांना बँका खरीप कर्ज देत नसून त्याकडे मुश्रीफ दुर्लक्ष करीत असल्याचेही त्यात म्हटले आहे.राज्यातील जिल्हा बँका व राष्ट्रीयीकृत बँकांना ४५ हजार ७८५ कोटींचे कर्जवाटपाचे उदिष्ट आहे. आजपर्यंत शेतकऱ्यांना केवळ १२ हजार ३१५ कोटींचे वाटप झालेले आहे. जिल्हा बँका कमकुवत असल्याने राष्ट्रीयीकृत बँकांना ३२ हजार २६१ कोटींचे उद्दिष्ट दिले होते, त्यांपैकी ४९०० कोटींचे वाटप या बँकांनी केले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना पीक कर्ज न मिळाल्याने त्यांची खरीप पेरणीची कामे थांबली आहेत.महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील दोन लाखांपर्यंतच्या व त्यावरील रकमेच्या शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी मिळालेली नाही. त्यामुळेच त्यांना खरिपाचे कर्ज मिळू शकलेले नाही. याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलन केले.

कोल्हापूर जिल्हा बँकेने १५८ टक्के कर्जवाटप केले, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांकडून अनेक शेतकरी कर्ज घेतात, जिल्ह्याची अग्रणी बँक म्हणून बँक ऑफ इंडियाच्या दारात आम्ही आंदोलन केले. त्यानंतर शेतकऱ्यांची वेदना राज्य सरकारला कळावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, त्यात गैर काय? मुळात अशा बाबींकडे राज्याचे अनुभवी मंत्री म्हणून हसन मुश्रीफ यांनी लक्ष देणे गरजेचे होते, असेही चंद्रकांत पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलPoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर