शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘मुन्ना-बंटी’ पॅच अपसाठी पवारांचा ‘डाव’; डी. वाय. पाटील यांच्या राष्टÑवादी प्रवेशाने कोल्हापूरचे राजकारण ढवळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:08 IST

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते व बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात ...

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते व बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आमदार सतेज पाटील यांचा खासदार धनंजय महाडिक यांना होत असलेला विरोध बोथट करण्याची खेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच रविवारी खेळली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. पवार काय करू शकतात, याचीही झलक या खेळीतून दिसल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.पवार यांचे अत्यंत विश्वासू नेते अंकुश काकडे आणि कर्नल संभाजी पाटील यांना पवार यांनी चक्क डी. वाय. पाटील यांच्या पुण्यातील निवासस्थानी पाठवून दिले आणि त्यांचा पक्ष प्राथमिक सदस्यत्वाचा फॉर्म भरून घेतला. एवढे करून ते गप्प बसले नाहीत. ही घटना लगेच माध्यमांतून व्हायरल करा, अशा सूचनाही काकडे यांना पक्षनेतृत्वाने दिल्या होत्या. त्यानुसार दुपारपासूनच ही बाब माध्यमे आणि सोशल मीडियावर व्हायरल झाली.डी. वाय. पाटील गेले अनेक दिवस पवार हे पंतप्रधान होणार आहेत, असे जाहीर कार्यक्रमांत सांगत आहेत. मला पवार यांना पंतप्रधान झालेले पाहायचे आहे आणि तसे घडणार असे मला माझे अंतर्मन सांगते, असेही ते बोलून दाखवितात. त्यांना भेटायला गेलेल्या संजय मंडलिक यांनाही त्यांनी ‘तुम्ही राष्ट्रवादीत या आणि मी तुम्हाला निवडून येण्यासाठी जी काय मदत लागेल ती करतो; पण पवार पंतप्रधान व्हायला पाहिजेत,’ असेही सांगितले होते. त्यांच्या या सदिच्छेचाच राष्ट्रवादीने पद्धतशीरपणे उपयोग करून घेतल्याचे स्पष्ट झाले.राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्यात टोकाचा राजकीय संघर्ष सुरू आहे. पवार यांनी सांगूनही सतेज पाटील हे महाडिक यांना मदत करणार नाहीत, अशी चर्चा आहे; कारण गेल्या निवडणुकीत पवार यांच्या शब्दाला मान देऊन सतेज पाटील यांनी महाडिक यांना मदत केली; पण विधानसभेला महाडिक गटाने त्याची परतफेड सतेज पाटील यांचा पराभव करून केल्याचा राग सतेज पाटील यांच्या मनात आहे. आता वडीलच त्या पक्षाचे सदस्य झाल्यावर सतेज यांच्या विरोधाला मर्यादा येऊ शकतात.डी. वाय. पाटील यांना काँग्रेसने दोन वेळा आमदारकी आणि त्रिपुरा आणि बिहारचे राज्यपाल केले. त्यांच्या शिक्षण संस्थांचा पसारा होण्यात व डी. वाय. पाटील यांची ‘शिक्षणसम्राट’ म्हणून ओळख आणि साम्राज्य निर्माण होण्यात काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा आहे. सतेज पाटील यांनाही काँग्रेसने राज्यमंत्रिपद दिले. राज्यात पुन्हा सत्ता आल्यास राज्य मंत्रिमंडळामध्ये त्यांना महत्त्वाचे स्थान असेल, अशी वाटचाल असताना मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीनेच त्यांच्या पायात पाय घालण्याचे राजकारण पद्धतशीरपणे केले आहे. नात्यातील कडीचाही राजकारणासाठी कसा बेमालूमपणे उपयोग केला जातो, याचे दर्शन या घडामोडीतून झाले. यामुळे कॉँग्रेस पक्षात, विशेषत: सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.‘सतेज’ यांच्या भाजपप्रवेशाची आठवणमध्यंतरी पुण्यात डी. वाय. पाटील विद्यापीठातील कार्यक्रम शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ‘सतेज पाटील यांनी भाजपमध्ये जावे,’ असे वक्तव्य डॉ. डी. वाय. पाटील यांनी करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर त्यांनी ‘यू’ टर्न घेतला होता, त्याची आठवण कार्यकर्त्यांना झाली.