शहरं
Join us  
Trending Stories
1
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
2
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
4
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
5
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
6
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
7
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
8
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
9
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
10
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
11
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
12
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
13
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
14
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
15
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
16
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
17
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
18
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
19
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
20
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 

‘कोल्हापूर’वर पवारांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:34 IST

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील रोजच्या घडामोडींचा अहवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या व्हॉट्स अ‍ॅपवर जात असल्याचे मंगळवारी ...

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील रोजच्या घडामोडींचा अहवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या व्हॉट्स अ‍ॅपवर जात असल्याचे मंगळवारी (दि. २) त्यांच्या दौऱ्यात निदर्शनास आले. त्या अहवालाच्या आधारेच त्यांनी काही कार्यकर्त्यांना त्याबाबत सूचना केल्या.काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना टोकाचा विरोध केल्यामुळे मतदारसंघातील वातावरण बदलले आहे. त्या पार्श्वभूमीवर काही पॅचअप करण्यासाठी पवार यांचा हा दौरा होता; परंतु प्रत्यक्षात तसे काही पॅचअप झाल्याचे दिसले नाही. नेत्यांच्या भेटीगाठी आणि त्यांचीच भाषणे असेच काहीसे या दौऱ्याचे स्वरूप राहिले. सतेज पाटील हे दिवसभर नॉट रिचेबल असल्याने त्यांच्याशी संपर्क अथवा संवाद होऊ शकला नाही. पूर्ण दौºयात सतेज पाटील यांचा विरोध, तसेच सतेज यांनी केलेले बंड हाच मुख्य मुद्दा केंद्रस्थानी राहिला; परंतु त्याबद्दल उघड काही चर्चा अथवा त्यांचे बंड शमविण्याबाबत काही तोडगा मात्र निघाला नाही. ते आता एवढे पुढे गेले आहेत की त्यांची मदत मिळण्याची शक्यता नसल्याचेही काही नेत्यांनी अप्रत्यक्षपणे पवार यांच्या निदर्शनास आणून दिले.भैया माने एक नंबरवरपवार यांना व्हॉट्स अ‍ॅपवर जी नावे गेली होती त्यामध्ये एक नंबरला आमदार हसन मुश्रीफ यांचे खंदे समर्थक भैया माने व त्यापाठोपाठ व्ही. बी. पाटील यांचे नाव होते. त्यांच्यासह अन्य काही प्रमुख कार्यकर्त्यांची नावे त्या यादीत होती. हे लोक अजूनही पक्षासाठी काम करीत नसल्याचा तो रिपोर्ट होता. त्याबद्दल पवार यांनी व्ही. बी. यांनाही विचारणा केली. त्यांनी आपणांस महाडिक कुटुंबीयांकडून कोणत्याच कार्यक्रमास निमंत्रण दिले जात नसल्याने प्रचारात सहभागी होण्यास अडचणी आल्याचे त्यांनी सांगितले.शेट्टी यांचीही विचारपूसमेळावा संपल्यावर पवार यांनी राजू शेट्टी यांना बोलावून घेऊन तुमच्या मतदारसंघात मी काही करायला लागते का, अशी विचारणा केली; परंतु शेट्टी यांनी त्याची काही गरज नसल्याचे त्यांना सांगितले. हातकणंगले मतदारसंघात महाडिक गट ‘स्वाभिमानी’च्या विरोधात काम करीत आहे, हे त्यांना माहीत असेलच; त्यामुळे मी काय त्यांच्याकडे तक्रार करणार नाही. असा विरोध संघटनेला नवा नाही. तो पत्करूनच आम्ही लढायची तयारी केल्याचे शेट्टी यांचे म्हणणे होते.माजी नगरसेवकांबद्दल तक्रारकोल्हापुरातील काही माजी नगरसेवकांना एकत्रित करून त्यांना प्रचारात उतरण्यासाठी पहिल्या टप्प्यातील ‘रसद’ पुरविण्यात आली; परंतु ते अजूनही सक्रिय झाले नसल्याची तक्रार झाली. त्यांच्याशी नीट समन्वय साधला जात नसल्याने असे घडत असल्याचे एका पदाधिकाºयाने सांगितले.