शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘पाटाकडील’, ‘पोलीस’ची आगेकूच : राजेश चषक फुटबॉल स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:44 IST

पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ने ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळाचा १-० ने; तर कोल्हापूर पोलीस संघाने खंडोबा तालीम मंडळ ‘अ’चा २-१ ने पराभव करीत राजेश चषक फुटबॉल स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. शाहू स्टेडियमवर सुरू

ठळक मुद्दे‘ऋणमुक्तेश्वर’, खंडोबा तालीम मंडळ ‘अ’ पराभूत

कोल्हापूर : पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ने ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळाचा १-० ने; तर कोल्हापूर पोलीस संघाने खंडोबा तालीम मंडळ ‘अ’चा २-१ ने पराभव करीत राजेश चषक फुटबॉल स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत शुक्रवारी पाटाकडील ‘अ’ व ऋणमुक्तेश्वर यांच्यात सामना झाला. प्रारंभापासून ‘पाटाकडील’कडून हृषिकेश मेथे-पाटील, सैफ हकीम, रणजित विचारे, पवनकुमार सरनाईक, इथो डेव्हिड यांनी गोल करण्याचे प्रयत्न केले; पण ‘ऋणमुक्तेश्वर’कडून जीवन लुद्रिक, अनिरुद्ध शिंदे, संदेश शिंदे यांनी प्रतिकार करीत चुरशीचा खेळ केला. त्यामुळे पूर्वार्धात सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.

उत्तरार्धात ५५ व्या मिनिटाला पाटाकडील ‘अ’च्या हृषिकेश मेथे-पाटीलने गोल करीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर ‘ऋणमुक्तेश्वर’कडून बरोबरी साधण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र, त्यांना अखेरपर्यंत गोल करण्यात यश आले नाही; त्यामुळे हा सामना एकमेव गोलने पाटाकडील ‘अ’ने जिंकला.दुसऱ्या सामना कोल्हापूर पोलीस संघ व खंडोबा ‘अ’ यांच्यात झाला. तिसºया मिनिटास मिळालेल्या संधीवर ‘खंडोबा’कडून ऋतुराज संकपाळने गोल करीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ‘पोलीस’ संघाकडून बरोबरी साधण्याचे प्रयत्न झाले. मात्र, त्यांना गोल करता आला नाही.

पूर्वार्धात ४९ व्या मिनिटास पोलीस संघाच्या इंद्रजित मोंडलने गोल करीत संघास १-१ असे बरोबरीत आणले. त्यानंतर पुन्हा ५२ व्या मिनिटास इंद्रजित मोंडलने पोलीस संघाचा व वैयक्तिक दुसरा गोल नोंदवत २-१ ने संघास सरशी मिळवून दिली. पोलीस संघाकडून युक्ती ठोंबरे, अजित पोवार, प्रथमेश हेरेकर, जय कामत, सोमनाथ पाटील; तर खंडोबा ‘अ’ संघाकडून प्रतीक सावंत, रणवीर जाधव, त्रिवेण डायस यांनी चांगला खेळ केला. मात्र, त्यांना बरोबरी साधता आली नाही. अखेरीस २-१ या गोलसंख्येवर कोल्हापूर पोलीस संघाने विजय मिळवत स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला.आजचा सामनादु. २ वा. शिवाजी तरुणमंडळ विरुद्ध बालगोपालदु. ४ वा. संयुक्त जुना बुधवार पेठ विरुद्ध प्रॅक्टिस ‘अ’. 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर