चंदगड : बेळगाव-वेंगुर्ला राजमार्गावर पाटणे फाटा येथे असलेल्या गोसावीनगर तलावाजवळ महिंद्र पिकअप (एमएच ०९ सी.ए. ७८२३) व हिरोहोंडा सीडी डॉन (जीए ०३ डी ००६७) यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात हिरोहोंडा मोटारसायकलस्वार उत्तम मल्लाप्पा मणिकेरी (वय ३५, रा. होसूर, ता. चंदगड) हे गंभीर जखमी झाले.याबाबत अधिक माहिती अशी, महिंद्रा पिकअप गाडी ही हलकर्णी फाट्याहून बेळगावकडे जात होती. हिरोहोंडास्वार कार्वेहून हलकर्णी फाट्याकडे येत होता. ही दोन्ही वाहने गोसावीनगरजवळ असलेल्या तलावाजवळ येताच त्यांच्यात समोरासमोर जोराची धडक झाली. धडकेत मोटारसायकलच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. अपघातानंतर महिंद्रा पिकअप गाडीचा चालक रामचंद्र बाळू भोगण (रा. बेकिनकेरे, ता. जि. बेळगाव) यांनी चंदगड पोलिसांत वर्दी दिली आहे.जमखी उत्तम याला बेळगावच्या केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अधिक तपास सहायक फौजदार एस. एम. चव्हाण करत आहेत. (प्रतिनिधी)
पाटणे फाट्यानजीक अपघातात होस्
By admin | Updated: May 3, 2014 17:07 IST