शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर रात्री २ वाजता रुग्णाला करून घेतले दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 14:40 IST

सख्ख्या भावाला घेऊन दिवसभर सीपीआर रुग्णालयासह तब्बल आठ रुग्णालयांत जाऊन आले; परंतु तरीही कोरोनाबाधित रुग्णास दाखल करून घेण्यास नकार. शेवटी वैतागून रात्री १०.३० वाजता सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट प्रसारित केली. त्याची जिल्हाधिकारी दौलत देसाई व पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दखल घेतली.

ठळक मुद्दे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर रात्री २ वाजता रुग्णाला करून घेतले दाखल आठ रुग्णालये पालथी घातली तरी सगळीकडेच नकार

हातकणंगले : सख्ख्या भावाला घेऊन दिवसभर सीपीआर रुग्णालयासह तब्बल आठ रुग्णालयांत जाऊन आले; परंतु तरीही कोरोनाबाधित रुग्णास दाखल करून घेण्यास नकार. शेवटी वैतागून रात्री १०.३० वाजता सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट प्रसारित केली. त्याची जिल्हाधिकारी दौलत देसाई व पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दखल घेतली.कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयास त्यांनी आदेश दिल्यानंतर रुग्णास रात्री दोन वाजता बेड उपलब्ध झाल्याची माहिती रुग्णाच्या भावाने मंगळवारी दिली. भावाची प्रकृती आता सुधारत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.मंत्र्यापासून ते जिल्हा प्रशासनापर्यंत सर्वजण रुग्णांस उपचाराविना परत पाठवू नका, असे वारंवार बजावत असताना व कारवाईचा इशारा दिला असतानाही रुग्णालये रुग्णांना दाखलच करून घेत नसल्याचा अनुभव अनेकांना येत आहे.

असाच अनुभव हातकणंगले तालुक्यातील एका व्यक्तीस आला. त्यांच्या भावाने ही माहिती सोशल मीडियावर प्रसारित केली. घडले ते असे : पांडुरंग केरबा बिडकर (वय ५८) यांची ८ ऑगस्टला थंडी-तापाने प्रकृती बिघडली. अतिग्रेतील घोडावत कोविड सेंटरमध्ये त्यांनी ८ ऑगस्टला स्राव दिला. त्याचा अहवाल १० ऑगस्टपर्यंत आला नाही. त्यांची प्रकृती खालावत गेली.

ऑक्सिजन पातळी ७४ पर्यंत खाली आल्याने घोडावतमध्ये पुन्हा रॅपिड टेस्ट केली. ती निगेटिव्ह आली. खासगी रक्त तपासणीमध्ये त्यांना डेग्यूची लक्षणे दिसली. रॅपिड टेस्ट निगेटिव्ह, सरकारी टेस्ट निगेटिव्ह आणि खासगी टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने गोंधळ उडाला.घोडावत सेंटरचे वैद्यकीय अधिकारी ड़ॉ. उत्तम मदने यांनी रॅपिड टेस्ट निगेटिव्ह आल्याने रुग्णाला हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आम्ही कोल्हापुरातील शाहूपुरीतील खासगी रुग्णालयात घेऊन गेलो. त्यांनी रुग्णाचा एचआरसीटी खासगी लॅबमध्ये करण्याचा सल्ला दिला. तो अहवाल पॉझिटिव्ह आला.

रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर या रुग्णालयाने त्याला दाखल करून घेतले नाही. त्यानंतर रात्री १० वाजेपर्यंत भावाला घेऊन फिरत होतो. सरकारी मदत कक्षाकडे फोन केला. त्यांनी शेंडा पार्क आणि महासैनिक दरबार हॉल येथे जाण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे महासैनिक दरबार येथे गेलो. त्यांनीही कोरोनाची भीती घालून नाकारले.

शेवटी रात्री ११ वाजता घरी जाताना घोडावतच्या डॉ. मदने यांना फोन करून भावास रात्रीसाठी ठेवून घ्या व ऑक्सिजन लावा, अशी विनंती केली. त्यावेळी आॉक्सिजन पातळी ५४ वर आली होती. दिवसभर सर्व दवाखान्यांनी दिलेला नकार व उपचार होत नसल्याचे पाहून मन सुन्न झाले आणि रात्री ११ वाजता सोशल मीडियावर उपचार होत नसल्याचा संदेश प्रसारित केला. त्याची दखल घेऊन रात्री १२ वाजता जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व सीपीआर रुग्णालयामधून फोन आले.

जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री एक वाजता भावासाठी सीपीआर आणि खासगी रुग्णालयात व्हेंटेलेटर बेड उपलब्ध करून दिला. रात्री दोन वाजता आम्ही भावास खासगी रुग्णालयात दाखल केले. आता त्यांची प्रकृती बरी आहे.तीन लाख भरा...तब्बल चार तास मी सीपीआर रुग्णालयासह तब्बल आठ रुग्णालयांमध्ये भावाला दाखल करण्यासाठी घेऊन गेलो. कोणीही दाद दिली नाही. काही खासगी दवाखान्यांनी तर प्रतिदिवस दहा हजार याप्रमाणे तीन लाख भरा; तरच उपचार करू, असे सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर