शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘पाटाकडील’-‘प्रॅक्टिस’ आज होणार अंतिम लढत-रिंकू राजगुरू, तेजस्विनी सावंत, अंजू तुरुंबेकर यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:53 IST

कोल्हापूर : पारंपरिक प्रतिस्पर्धी समजले जाणारे पाटाकडील तालीम मंडळ व प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ हे दोन्ही संघ आज, रविवारी अटल चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकमेकांशी भिडणार आहेत.पाटाकडील तालीम मंडळाने यंदाच्या हंगामात के. एस. ए. लीग फुटबॉल स्पर्धा व राजेश चषक फुटबॉल स्पर्धा या स्पर्धा अनुक्रमे प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ ...

ठळक मुद्दे अटल चषक फुटबॉल

कोल्हापूर : पारंपरिक प्रतिस्पर्धी समजले जाणारे पाटाकडील तालीम मंडळ व प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ हे दोन्ही संघ आज, रविवारी अटल चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकमेकांशी भिडणार आहेत.पाटाकडील तालीम मंडळाने यंदाच्या हंगामात के. एस. ए. लीग फुटबॉल स्पर्धा व राजेश चषक फुटबॉल स्पर्धा या स्पर्धा अनुक्रमे प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ व खंडोबा तालीम मंडळ ‘अ’वर मात करीत जिंकल्या आहेत. यात ‘पाटाकडील’चे समर्थक हे त्यांचे ऊर्जास्थान आहेत. आक्रमक, वेगवान चाली रचण्यासाठी ‘पाटाकडील’ची ख्याती आहे. ‘पाटाकडील’ची मदार हृषीकेश मेथे-पाटील, ओबे अकीम यांच्यावर अधिक आहे; तसेच कोल्हापूरच्या फुटबॉल जगतामध्ये त्यांचा ‘पिवळा निळा’ टी-शर्ट संघाच्या स्थापनेपासून प्रसिद्ध आहे. प्रॅक्टिस क्लब हा संघ संयमी खेळीसाठी ख्यातकीर्त आहे. या संघातील खेळाडू शॉर्ट पासिंग व मैदानी खेळावर भर देणारे आहेत; तर ‘पाटाकडील’प्रमाणे प्रॅक्टिस संघाचीही बचावफळी भक्कम आहे. संघाची मदार कैलास पाटील, राहुल पाटील यांच्यावर अधिक आहे. संघाचा काळा-पांढरा टी-शर्टही स्थापनेपासून प्रसिद्ध आहे. के.एस.ए. लीग स्पर्धेत ‘पाटाकडील’ अग्रस्थानी, तर ‘प्रॅक्टिस’ द्वितीय स्थानी आहे. त्यामुळे आज, रविवारच्या सामन्यात पाटाकडील हंगामातील तिसरे विजेतेपद पटकावणार का, ‘प्रॅक्टिस’ हा वारू रोखून सर्वांत मोठ्या बक्षिसांची स्पर्धा जिंकणार याकडे सर्व फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. सोशल मीडियावरूनही याची जोरात चर्चा सुरू आहे.यांच्यावर असेल भिस्तपाटाकडील ‘अ’कडून हमखास गोल करणारे हृषीकेश मेथे-पाटील, ओबे अकीम, वृषभ ढेरे, आेंकार संभाजी जाधव, ओंकार वैभव जाधव, ओंकार पाटील ही आघाडीची फळी आहे; तर रणजित विचारे, इथो ओबेलो, प्रवीण जाधव, रूपेश सुर्वे, अक्षय मेथे-पाटील अशी भक्कम बचावफळी आहे. ‘प्रॅक्टिस’कडून कैलास पाटील, राहुल पाटील, इंद्रजित चौगुले, सागर चिले, फेनियन ही आघाडीची फळी व अभिजित शिंदे, अजित पोवार, प्रतीक बदामे, इडाची फ्रान्सिस ही भक्कम बचावफळी आहे.युवा फुटबॉलपटंूचा विशेष सत्कारसामन्याचा बक्षीस समारंभ ‘सैराट’ चित्रपटातील ‘आर्ची’ अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू, सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत, देशातील सर्वांत कमी वयाची ए लायसेन्सधारक फुटबॉल प्रशिक्षक अंजू तुरुंबेकर व पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. अध्यक्षस्थानी के. एस. ए.चे पेट्रन चीफ शाहू छत्रपती असणार आहेत. यासह आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉलपटू यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल