शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
2
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
3
मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का?
4
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्ठा राडा !! मोहम्मद रिझवान पाक क्रिकेट बोर्डाला नडला... काय घडलं?
5
किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; सेन्सेक्स ८५,००० अंकांच्या आणि निफ्टी २६,००० अंकांच्या जवळ
6
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
7
PPF ला साधं समजू नका! पती-पत्नी मिळून बनवू शकता ₹१.३३ कोटींचा फंड, तोही टॅक्स फ्री
8
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
9
'तो' प्रवास ठरला शेवटचा! कुटुंबीयांसमोरच वडील आणि मुलीचा होरपळून मृत्यू; १० जण जखमी
10
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
11
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
12
बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?
13
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
14
शोधत होते दारू, सापडले एक कोटी रुपये; तपासणी नाक्यावर खाजगी बसमध्ये आढळली अवैध रक्कम
15
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
16
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
17
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
18
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
19
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
20
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट

पासपोर्टची पडताळणी होणार घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:17 IST

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पासपोर्टसाठी लागणारी पोलीस पडताळणी (व्हेरिफिकेशन) वेळेत होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. आता हीच पडताळणी पोलीस घरी येऊन करणार आहेत. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांना टॅब देण्यात आले आहेत. १ जानेवारी २०१८ पासून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलीस प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे.कोल्हापुरातून साधारणत: वर्षाकाठी सुमारे ...

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पासपोर्टसाठी लागणारी पोलीस पडताळणी (व्हेरिफिकेशन) वेळेत होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. आता हीच पडताळणी पोलीस घरी येऊन करणार आहेत. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांना टॅब देण्यात आले आहेत. १ जानेवारी २०१८ पासून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलीस प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे.कोल्हापुरातून साधारणत: वर्षाकाठी सुमारे २० ते २५ हजार नागरिक, विद्यार्थी हे पासपोर्टसाठी अर्ज करतात. अचानक पासपोर्टची गरज लागल्यास, कागदपत्रांची छाननी, त्यातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी येथील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी पुण्याला जावे लागत होते. धावपळ, वेळ आणि पैसा खर्च होत होता.परराष्ट्र खात्याकडून कसबा बावडा मार्गावरील पोस्टाच्या मुख्य कार्यालयात स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय सुरू केल्याने पुण्याला जावे लागत नाही; परंतु पासपोर्टसाठी संबंधित व्यक्तीचा अर्ज पोलीस पडताळणीसाठी पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्याला गोपनीय विभागाकडून निरोप दिला जातो.काहीवेळा कर्मचाºयांवर कामाचा अतिरिक्त भार असल्याने अर्ज पुढे जाण्यासाठी रेंगाळतात, तर काही वेळा संबंधित व्यक्ती पाठपुरावा करत नसल्याने अर्जांकडे कोणी लक्ष देत नाही. या घोळामध्ये पासपोर्ट अर्जांच्या पडताळणीला विलंब होतो. लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना ७२ तासांच्या आत पासपोर्टच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून ते पुढील कार्यवाहीसाठी पासपोर्ट केंद्राला पाठवून देण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागातील कर्मचाºयांना दिले आहेत.पोलीस मुख्यालयातील पासपोर्ट विभागास एका पासपोर्टची एकवीस दिवसात प्रक्रिया पूर्ण केल्यास १५० रुपये मिळतात. वर्षभरात २६ हजार पासपोर्टची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्या प्रत्येकामागे १५० रुपयांप्रमाणे ३ लाख ९० हजार रुपये शासनाकडून मिळाले आहेत तसेच प्रत्येक नागरिकाने पासपोर्टसाठी अर्ज केल्यास त्याचेकडून पंधराशे रुपये भरून घेतले जातात.या जमा झालेल्या निधीतून पासपोर्ट विभागाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना प्रत्येकी दोन टॅब दिले आहेत. नागरिकांच्यासोयीसाठी पोलीस ठाण्यात होणारी पडताळणी आता पोलीस घरी जाऊन करणार आहेत. त्यामुळे नागरिकांना पासपोर्टसाठी पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागणार नाही.दहा दिवसांत पासपोर्ट हातीपासपोर्ट काढण्यासाठी सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करून तो अर्ज पोलीस मुख्यालयातील पासपोर्ट विभागात सादर केला जातो तेथून तो पोलीस पडताळणीसाठी संबंधित पोलीस ठाण्यात पाठविला जातो. येथील गोपनीय विभागाकडून संबंधित व्यक्तीवर कोणत्याही प्रकारे गुन्हे दाखल नसल्याची खात्री केली जाते. त्यानंतर पोलीस निरीक्षकांच्या समोर होणारी ओळख परेड आता थेट पोलीस घरी जावून करतील. त्यानंतर तो अर्ज टपालाने पुन्हा पासपोर्ट विभागाला पाठविला जाईल. त्यानंतर तो येथील निरीक्षकांच्या सहीने कसबा बावडा येथील टपाल कार्यालयातील पासपोर्ट केंद्राला पाठविला जाईल. तेथून तो जावक क्रमांक देऊन पुणे पासपोर्ट कार्यालयाकडे पाठविला जाईल. अवघ्या दहा दिवसांत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांच्या घरी पासपोर्ट टपालाने मिळणार आहे.नागरिकांच्या सोयीसाठी आता पोलीस त्यांच्या घरी जावून पासपोर्ट संबंधी पडताळणी करणार आहेत. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांना टॅब देण्यात आले आहेत. जानेवारी २०१८ मध्ये ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलीस प्रशासनाची तयारी सुरू आहे.-शिवाजी शेंडे, सहायक पोलीस निरीक्षक, पासपोर्ट विभाग