शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भुदरगड तालुक्यात सेना विरोधात पक्षाचेच आमदार

By admin | Updated: February 8, 2017 00:57 IST

जिल्हा परिषद निवडणूक रणांगण : स्थानिक आघाडी करून रिंगणात

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यात शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव गटाशी आघाडी केल्यामुळे तिथे शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे ‘आमदारांच्या उमेदवारांच्या विरोधात शिवसेनेचे चिन्हांवरील उमेदवार’ अशी वेगळीच लढत होत आहे.जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी सोमवारी रात्री या तालुक्यातील अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार आकुर्डेतून प्रवीण देवेकर तर कडगांव जिल्हा परिषदमधून विजेता महादेव मसूरकर यांना उमेदवारी दिली आहे. त्याशिवाय मडिलगे, पिंपळगांव, पुष्पनगर, आकुर्डे, कूर आणि कडगांव पंचायत समितीसाठी पक्षाने उमेदवारी दिली आहे.शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडून टाकल्यानंतर जिथे पक्षाचे विद्यमान आमदार आहेत तिथे चिन्हांवरच उमेदवार उभे केले जावेत, असा आग्रह धरला. त्यानुसार आमदार आबिटकर यांनाही तसे कळविण्यात आले होते; परंतु निवडणुकीत चांगले यश मिळविण्यासाठी स्थानिक पातळीवर जाधव गटाशी आघाडी करणे आवश्यक असल्याने त्यांनी धनुष्यबाण चिन्ह घेऊन लढण्यास असमर्थता दर्शविली. विधानसभा निवडणुकीतही आबिटकर यांना जाधव गटाने चांगली मदत केली होती. (प्रतिनिधी)पक्षचिन्हच गोठविले...स्थानिक राजकारणाची गरज म्हणून त्यांनी पक्षाचे चिन्ह घेतले नसले तरी त्यामुळे आमदारांनीच पक्षचिन्ह गोठविल्याचे चित्र मात्र पुढे आले आहे.