शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात ‘पक्षीय’ गुंता : कॉँग्रेसचे आमदार सेनेच्या, तर भाजपचे राष्टवादीच्या प्रचारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:54 IST

कॉँग्रेसचे आमदार शिवसेनेच्या, तर भाजपचे आमच्या ्नराष्ट्रवादीच्या व्यासपीठावर, अशी विचित्र परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली असून, ती दुरुस्त करण्यास वेळ कशाला घालवायचा? असा सवाल करीत आपण सतेज पाटील यांच्यासह वरिष्ठांशी संपर्क साधला नाही; खासदारांनीच साधला असेल तर

कोल्हापूर : कॉँग्रेसचे आमदार शिवसेनेच्या, तर भाजपचे आमच्या ्नराष्ट्रवादीच्या व्यासपीठावर, अशी विचित्र परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली असून, ती दुरुस्त करण्यास वेळ कशाला घालवायचा? असा सवाल करीत आपण सतेज पाटील यांच्यासह वरिष्ठांशी संपर्क साधला नाही; खासदारांनीच साधला असेल तर आपणाला माहिती नसल्याचे राष्टÑवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी खासदार धनंजय महाडिक यांच्या ताराराणी चौकातील कार्यालयात मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर हसन मुश्रीफ व धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार मुश्रीफ म्हणाले, मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची प्राथमिक बैठक बोलावून त्यांच्याशी चर्चा करून प्रचाराची रणनीती ठरविली जाणार आहे. कागलमध्ये आपण, राधानगरी-भुदरगडमध्ये के. पी. पाटील व ए. वाय. पाटील; तर चंदगड मतदारसंघात आमदार संध्यादेवी कुपेकर हे उद्यापासूनच प्रचारास सुरुवात करतील. जिथे राष्टÑवादीची ताकद कमी आहे, त्या ‘करवीर’मध्ये मधुकर जांभळे, ‘उत्तर’मध्ये आर. के. पोवार, तर ‘दक्षिण’मध्ये स्वत: महाडिक गावागावांत जाणार आहेत.

कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे उघड शिवसेनेच्या प्रचारात असल्याबाबत लक्ष वेधले असता, मुश्रीफ म्हणाले, जे आहे ते अपेक्षितच होते. त्यासाठी आता वेळ कशाला घालवायचा? कॉँग्रेसचे आमदार शिवसेनेच्या, तर भाजपचे आमच्या व्यासपीठावर जिल्ह्यात ‘पक्षीय’ गुंता(पान १ वरून) अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत आपण तरी सतेज पाटील व दोन्ही कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी काहीही बोललो नाही. खासदार काय बोलले असतील तर मला माहिती नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, के. पी. पाटील, आर. के. पोवार, आदिल फरास उपस्थित होते‘त्यांच्या’बाबतचा निर्णय वरिष्ठ कॉँग्रेस नेतेच घेतील : महाडिककोल्हापूर : आपण कोणाशी बोललो नाही, ज्यांचा पंतप्रधान करायचा आहे, ते बघतील. त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आपल्या आमदार, पदाधिकाऱ्यांना सांभाळतील, असे खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी येथे पत्रकारांना सांगितले. आमदार हसन मुश्रीफ यांनी आपण सतेज पाटील व दोन्ही कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी काहीही बोललो नाही. खासदार काय बोलले असतील तर मला माहिती नसल्याची टिप्पणी केली होती. त्यावर खासदार महाडिक यांनी असे प्रत्युत्तर देऊन सतेज पाटील यांची मनधरणी करणार नसल्याचेच स्पष्ट केले.आघाडीची घोषणा लवकर होणे अपेक्षितकॉँग्रेससोबतची आघाडी निश्चित असली तरी प्रचारात सक्रिय करण्यासाठी लवकर निर्णय अपेक्षित आहे. आघाडीत शेकाप, जनता दल, रिपाइं (गवई व कवाडे गट) हेही पक्ष असून, त्यांनाही सक्रिय करावे लागणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.अमल उघड प्रचार करतीलआमदार अमल महाडिक हे धनंजय महाडिक यांचे भाऊ आहेत. भाऊ निवडणुकीस उभारल्याने ते उघड प्रचार करतील, त्यात लपविण्यासारखे काय आहे? असे मुश्रीफ यांनी सांगितले.

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर