शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीचे विभाजन गडमुडशिंगीकरांच्या मुळावर

By admin | Updated: August 28, 2014 23:36 IST

खुद्द प्रकल्पग्रस्तांचाही विरोध : ७०० एकर महसूल क्षेत्र गमावणार; ग्रामस्थांच्यावतीने न्यायालयात दाद मागणार : सरपंच

शिवाजी कोळी - वसगडे-चिंचवाड गावठाण हद्दवाढ, जंगल, प्रकल्पग्रस्तांसाठी जमीन, दूधगंगा डावा कालवा, धरणग्रस्तांसाठी गावठाण अशा अनेक कारणांसाठी सुमारे सव्वापाचशेच्या वर एकर जमीन गमावून बसलेल्या गडमुडशिंगीकरांना ग्रामपंचायत विभाजनामुळे आता परत ७०० एकरांच्या महसूल (गायरान) क्षेत्राला मुकावे लागणार आहे. त्यामुळे ‘न्यू वाडदे’ची स्वतंत्र ग्रामपंचायत गडमुडशिंगीवासीयांच्या मुळावरच उठली आहे. आता काहीही झाले तरी गावाचे तुकडे पडू देणार नाही, असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे गावच्या दक्षिणेस सुमारे एक किलोमीटर अंतरावर धरणग्रस्तांची ‘न्यू वाडदे’ वसाहत १९८९ साली वसली. सुमारे ६५० ते ७०० लोकसंख्या असणाऱ्या या वसाहतीला मागील २५ वर्षांपासून गडमुडशिंगी ग्रामपंचायतीकडून पिण्याचे पाणी, रस्ते, सांडपाण्याचा निचरा, वीज, शैक्षणिक व आरोग्य अशा सोयी- सुविधा पुरविल्या जातात. मुडशिंगीकरांनी या वसाहतीच्या स्थापनेसाठी याआधी पोटापाण्यासाठी जमीन म्हणून ३५ हेक्टर, तसेच राहण्यासाठी गावठाण म्हणून साडेदहा हेक्टर क्षेत्र दिल्याची वस्तुस्थिती आहे. गावातील विकास संस्था, पाणीपुरवठा संस्थांच्या माध्यमातून वसाहतीतील लोकांशी चांगलीच ‘नाळ’ जुळली असताना व ग्रामपंचायतीकडून सर्व सुविधा पुरविल्या जात असताना काही विघ्नसंतोषी लोकांनी ग्रामपंचायतीच्या विभाजनाची मागणी केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. किंबहुना वसाहतीतील सुमारे ४०च्या वर ग्रामस्थांनी प्रतिज्ञापत्राद्वारे स्वतंत्र ग्रामपंचायतीस विरोध दर्शविला आहे.गावसभेचा ठराव नसताना सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून आवश्यक ‘त्या’ निकषांची पूर्तता होत नसताना २५ फेब्रुवारीला ग्रामविकास व जलसंधारण विभागाने राजपत्र असाधारण भाग - ४ (अ) अनुसार ‘न्यू वाडदे’ हे स्वतंत्र महसूल गाव घोषित केले, तर शासनाचे कक्ष अधिकारी श. र. साबळे यांनी राजपत्राच्या आदल्या दिवशीच स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या स्थापनेचा आदेश काढल्याने प्रशासनाचा सावळागोंधळ निदर्शनास आला आहे.