शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
3
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
4
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
7
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
8
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
9
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
10
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
11
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
12
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
13
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
14
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
15
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
16
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
17
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
18
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
19
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

आबदारकडून परमिंदर सिंग चित

By admin | Updated: February 20, 2015 23:10 IST

चिंचोलीत कुस्ती मैदान: मारुती जाधवची समाधान घोडकेवर मात

येळापूर (जि.सांगली) : चिंचोली (ता. शिराळा) येथे आत्मलिंग देवाच्या यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार याने भारत केसरी परमिंदर सिंग याला ९ व्या मिनिटाला पोकळ घिस्सा डावावर अस्मान दाखवले. नंदू आबदार याला प्रथम क्रमांकाचे दीड लाखाचे बक्षिस देवून गौरविण्यात आले.कुस्ती मैदानाचे उद्घाटन सरपंच अमर पाटील, डी. आर. जाधव, उत्तम पाटील, चंदर पाटील, संपत जाधव, दत्ताजी पाटील, शिवाजी पाटील, तानाजी जाधव यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी आर. आर. पाटील यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.द्वितीय क्रमांकाच्या १ लाख रुपये इनामासाठी महाराष्ट्र चॅम्पियन मारुती जाधव व महाराष्ट्र केसरी समाधान घोडके यांच्यात लढत झाली. या लढतीत चौथ्या मिनिटाला डंकी डावावर मारुतीने समाधानला चितपट केले. तृतीय क्रमांकाच्या ७५ हजाराच्या बक्षिसासाठी लावण्यात आलेल्या कुस्तीमध्ये विष्णू धुमछडी याने गणेश जगतापला गुणांवर पराजीत केले. चौथ्या क्रमांकाच्या लढतीत नाना ठोंबरने जयपाल वाघमोडेस आकडी डावावर चितपट केले. पाचव्या क्रमांकाच्या लढतीमध्ये समीर देसाई याने धनाजी पाटीलवर गुणाने विजय मिळविला. सहाव्या क्रमांकाच्या लढतीत प्रदीप जाधव (मुंबई पोलीस) याने हरेल पाटील याच्यावर एकचाक डावावर पाचव्या मिनिटाला विजय मिळवला.मैदानातील अन्य विजयी मल्लांमध्ये राहुल पाटील, राहुल जाधव, उदय जोंधळे, अमृत जाधव, प्रकाश जाधव, सचिन शेडगे, संदीप माने, किरण शेडगे, ऋषीकेश जाधव, कपील पाटील, उत्तम घोलप, राजेश जाधव, दत्ता बनकर, अभिजीत भोसले, सागर निकम, गणेश गुरव, प्रथमेश पाटील, अक्षय जाधव, विक्रम चव्हाण, विशाल जाधव, रणजीत पाटील, मारुती सावंत, रविराज यादव, धैर्यशील सकटे, सुशिल गायकवाड, सत्यजित जाधव, अभिजीत बनकर, शंभूराजे पाटील, अक्षय सुतार, सोनू लाड, प्रशांत कुंभार, अजय केसरे, अरविंद पाटील यांचा समावेश आहे.मैदानास आमदार शिवाजीराव नाईक, काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख, हणमंत पाटील, माथाडी नेते बबनराव चिंचोलकर, नामदेवराव मोहिते, विकास नांगरे, उद्योजक युवराज पवार, संभाजी ढवळे, लक्ष्मण भोसले, जालिंदर पाटील, विलास जाधव, अमर पाटील, बाबजी पाटील, शिवाजी लाड, राजू गोळे, जयवंत कडोले उपस्थित होते. बंडा पाटील रेठरेकर, हणमंतराव जाधव, विकास पाटील, दत्ता जाधव, कृष्णा कळंत्रे, संदीप पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. (वार्ताहर)