शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
3
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
4
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
5
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
6
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
7
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
9
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
10
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
11
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
12
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
13
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
14
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
15
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
16
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
17
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
18
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
19
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
20
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी

पार्लेत हत्तींचा उच्छाद

By admin | Updated: December 26, 2014 00:46 IST

१२ दिवसांपासून धुमाकूळ : वीस एकर ऊस, शंभर पोती भाताचे नुकसान

चंदगड : गेले १२ दिवस पार्ले (ता. चंदगड) येथील धनगरवाड्याजवळ असलेल्या म्हार झाऱ्याजवळील पाझर तलावाजवळ ठाण मांडून असलेल्या ५ हत्तींच्या कळपाने येथील शेतकऱ्याचा ऊस, भात, केळी, बाबूंच्या बेटी आदी पिकांचे नुकसान करून उच्छाद मांडला आहे. १२ दिवसांपासून हत्तीचा या ठकाणी मुक्काम आहे.धनगरवाड्याजवळ असलेल्या पाझर तलावात दिवसभर मस्त डुंबायचे व रात्री गावालगतच्या शिवारातील पिकांचे नुकसान करायचे, असा या हत्तींचा दिनक्रम सुरू आहे. या हत्तींच्या नुकसानीपुढे वनविभागही हतबल झाला आहे. केवळ पंचनामे करण्यापलीकडे वनविभागाचे कर्मचारी काहीच करू शकत नाहीत. वनविभागाकडे हत्तींना हुसकावून लावण्यासाठी ठोस उपाययोजना नसल्याने शेतकऱ्यांनाही नुकसान सोसण्यापलीकडे काहीच करता येत नाही. या परिसरातील कृष्णा दत्तू गावडे, विकास दत्तू पाटील, सटू जानकू गावडे, लक्ष्मण जोतिबा गावडे, गुंडू पोमाजी गावडे, सटू जानकू पाटील, लक्ष्मण नागोजी फाटक, दत्तू आप्पाजी फाटक, तानाजी गुरव यांच्या जवळपास २० एकर क्षेत्रातील ऊस फस्त केला आहे तर भात मळून ट्रॅक्टरमध्ये भरलेली गुंडू बापू गावडे यांची ३० भाताची व विठू गोपाळ पाटील यांची खळ्यावरील २० पोती भात हत्तींनी खाऊन फक्त केले आहे.यशवंत म्हाकेकर यांचे १० पोती भात, भावकू गावकर, निळू गावडे २० पोती भात, १ केळी बाग, रेमा झिलू गावडे, लक्ष्मण गावडे, गणु रामा गावडे यांच्या भाताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. याशिवाय वैजू डामू गावडे, शामराव नरसू गावडे, ओमाणा डामू गावडे यांच्या बांबूंच्या बेटी व विठ्ठल गणू गावडे यांच्या मिरचीचे तरवा हत्तींनी फस्त करून मोठे नुकसान केले आहे. गावातील अन्य शेतकऱ्यांच्याही पिकांचे हत्तींनी नुकसान केले.वनविभागाचे कर्मचारी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम करत आहेत. पण मिळणारी नुकसानभरपाई व झालेले नुकसान यामध्ये तफावत असून वर्षभर घातलेल्या खताचा खर्चही निघत नाही. हत्तींनी घातलेल्या नुकसानीच्या धाडसत्रात येथील शेतकरी हतबल झाला असून, हत्ती हटाव मोहीम प्रभावीपणे राबवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. (प्रतिनिधी)दरवर्षी डिसेंबर १५ पूर्वी हे हत्ती कर्नाटकमध्ये जात असतात. मात्र, यावर्षी तालुक्यात उशिरा अवकाळी पडलेल्या पावसामुळे सुगी १ महिना लांबली आहे. त्यामुळे हत्तींना मुबलक चारा व पाणी मिळत आहे. त्यामुळे हत्तींचा परतीचा कालावधी वाढला आहे. सुगी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे हत्ती ८ दिवसांत मार्गक्रमण करतील, अशी शक्यता आहे.- एस. बी. तळवडेकर, वनक्षेत्रपाल पाटणेहत्तींनी केलेल्या नुकसानीचे पंचनामे वनविभाग करीत आहे. ही चांगली बाब आहे. मात्र, होणारे नुकसान व मिळणारी भरपाई यांचा ताळमेळ बसत नाही. वर्षभर घातलेल्या खत व मजुरी मशागत यांचा निम्मा खर्चही भरपाईपोटी मिळत नाही. त्यामुळे वनविभागाकडून नुकसानभरपाई नको पण हत्तींचा बंदोबस्त कायमचा करावा.- विठ्ठल गणु गावडे, नुकसानग्रस्त शेतकरी, पार्ले.