शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

हातकणंगलेत दाम्पत्याची आत्महत्या

By admin | Updated: January 24, 2016 00:59 IST

संशयित युवक ताब्यात : चिठ्ठीत पत्नीवर अतिप्रसंग, त्रास दिल्याचा उल्लेख

हातकणंगले : येथील खोत वसाहतीमधील युवकाच्या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून येथील शेतकरी कुटुंबातील यशवंत आण्णासो फुलारी (वय 3७) आणि त्याची पत्नी रागिणी यशवंत फुलारी (३२) या दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना लक्ष्मी इंडस्ट्रीज रस्त्यानजीक फुलारे मळ्यात शनिवारी पहाटे उघडकीस आली. फुलारी दाम्पत्याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या अरुण पांडुरंग खोत या संशयित युवकास हातकणंगले पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याबाबतचा गुन्हा हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. घटनास्थळ व हातकणंगले पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, हातकणंगले येथील यशवंत फुलारी याची शेतजमीन लक्ष्मी ओद्योगिक वसाहतीजवळ आहे. याच ठिकाणी त्यांचा जनावरांचा गोठा वजा शेड आहे. दररोज शेताकडे जाऊन जनावरांची देखभाल करण्याचे काम यशवंत आणि त्यांची पत्नी करीत होते. इतरवेळी शेतातील काम करून हे कुटुंब गुण्यागोविंदाने राहत होते. शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर खोतवाडी वसाहतीमधील एका युवकाची नजर यशवंत यांची पत्नी रागिणीवर पडली होती. शुक्रवारी रात्री यशवंत आणि त्यांची पत्नी रागिणी घरामध्ये जेवण झाल्यावर आपल्या भाच्याची मोटारसायकल घेऊन नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी जातो, असे सांगून घरातून बाहेर पडले. त्यांनी शेतातील जनावरांचा गोठा गाठला आणि गोठ्यातील तुळईस गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी म्हैशींचे दूध आणण्यास गेलेल्या यशवंतच्या भावाच्या लक्षात आली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी दोन पाने चिठ्ठी लिहून ठेवली होती. ही चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. यशवंत याने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये त्याने सविस्तर मजकूर लिहिला आहे. त्यात म्हटले आहे की, गावातील खोत वसाहतीमधील अरुण पांडुरंग खोत हा युवक आपली पत्नी रागिणी हिला वारंवार मानसिक त्रास देतो. दोन ते तीनवेळा त्याने रागिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आम्हाला ठार मारण्याची धमकी दिली जाते. या युवकापासून आमच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. म्हणून आम्ही आत्महत्या करीत आहोत. दरम्यान, यशवंत व त्याची पत्नी रागिणी यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या अरुण पांडुरंग खोत या युवकास हातकणंगले पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यशवंत आणि त्याची पत्नी रागिणी यांच्या आत्महत्येमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहाची उत्तरीय तपासणी हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले आहेत. गावगुंडांना पोलिसांची भीती नाही हातकणंगले या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पोलिसांचा वचक गुन्हेगारांवर नाही, हे यावरून सिद्ध होत आहे. गावगुंड आणि फाळकूटदादांना पोलिसांची भीती उरली नसल्याचे आजच्या घटनेवरून पुन्हा स्पष्ट होत आहे. मुलांचा आक्रोश यशवंत आणि त्याची पत्नी रागिणी यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. दोघांचे मृतदेह पाहताच मुलांनी टाहो फोडला होता. त्यांच्या आक्रोशाने उपस्थितांचे हृदय पिळवटून जात होते. रिंगटोनची चर्चा यशवंतच्या मोबाईलवर ‘जिना यहाँ मरणा यहाँ’ ही रिंगटोन होती. त्याने आपली जीवनयात्रा संपविली. या दरम्यान त्यांच्या मोबाईलवर आठ-दहा कॉल येऊन गेले होते. त्यावेळी वरील रिंग वाजतच होती. या रिंगटोनची चर्चा या ठिकाणी सुरू होती.