शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मराठी शाळेसाठी पेरणोलीकरांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:07 IST

कृष्णा सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कआजरा : जिल्हा परिषदेच्या शाळा सध्या संक्रमणातून जात असताना पेरणोली ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने विविध स्तुत्य उपक्रम राबवून येथील मराठी शाळेसाठी पहिल्या टप्यात ७० हजाराचा लोकसहभागातून निधी जमा केला आहे. शाळाबाह्य व अंतर्गत गुणवत्तापूर्ण करण्यासाठी पेरणोलीकरांची धडपड सुरू आहे.सुशोभीकरण करून शाळेची इमारत देखणी केली आहे. ...

कृष्णा सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कआजरा : जिल्हा परिषदेच्या शाळा सध्या संक्रमणातून जात असताना पेरणोली ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने विविध स्तुत्य उपक्रम राबवून येथील मराठी शाळेसाठी पहिल्या टप्यात ७० हजाराचा लोकसहभागातून निधी जमा केला आहे. शाळाबाह्य व अंतर्गत गुणवत्तापूर्ण करण्यासाठी पेरणोलीकरांची धडपड सुरू आहे.सुशोभीकरण करून शाळेची इमारत देखणी केली आहे. संरक्षक भिंतीवर झाडे लावा, झाडे जगवा, पाणी नाही-जीवन नाही, मुलगा-मुलगी भेद नको, मुलगी झाली खेद नको, गाव करा हागणदारीमुक्त आदी प्रबोधनात्मक वाक्ये व चित्रांद्वारे जनजागृती केली आहे.माजी सरपंच तुकाराम सुतार यांच्या कालखंडात १४ व्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या शाळेतील शौचालय, बाथरूमचे काम सरपंच दीपिका सुतार, उपसरपंच प्राजक्ता देसाई व सर्व सदस्य यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाले आहे.पेरणोलीतील ग्रामस्थ, समिती, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी शाळेला संजीवनी देण्यासाठी सुरू केलेले प्रयत्न म्हणजे आशेचा किरण आहे. यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या गुणवत्तापूर्ण शाळा टिकविण्यासाठी पेरणोली ग्रामस्थांतून प्रारंभ झाला आहे.शाळेच्या माजी व्यवस्थापन समितीने कोणत्याही कार्यक्रमाचा प्रारंभ शिक्षणक्षेत्रात क्रांती केलेल्या फुले दाम्पत्य, शिवाजी महाराज, शाहू, आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने घालून दिलेल्या पायंड्याने होतो. मूल्य शिक्षणावर भर, मुलांचा वाढदिवस व खासगी कार्यक्रमासाठी शाळेचा वापर करण्यावर बंदी आदी निर्णय घेऊन शाळा गुणवत्तापूर्ण व संस्कारित करण्याचा निर्णय घेतला आहे.समितीने शाळेच्या बाह्यांगाची सजावट, प्रबोधनात्मक घोषवाक्य व चित्रे रेखाटून शाळा बहुआयामी गुणवत्ताधारक करण्याचा प्रयत्न करून कळस चढवला आहे. मराठी शाळा मोडीत काढण्याचे शासनाचे धोरण पाहता पेरणोलीसारख्या सामाजिकदृष्ट्या व चळवळीच्या गावातून शाळा वाचविण्यासाठी तरुण कार्यकर्ते व ग्रामस्थांनी केलेला प्रारंभ म्हणजे अंधारानंतर येणारा प्रकाश असे समजले जाते. याकामी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संजय दळवी, उपाध्यक्षा रोहिणी देसाई, सदस्य अरुण जाधव, काका देसाई, युवराज लोंढे, पवन कालेकर, मुख्याध्यापक प्रकाश देऊसकर, शिक्षक व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे.सोशल मीडियातून निधीसोशल मीडियाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात ७० हजार निधी जमा झाला, तर लोकसहभागातून २ लाख रुपये जमा करून शाळेला भविष्यात कोणतीही कमतरता भासणार नाही. याची काळजी घेण्यात येणार आहे.