शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे यांची हत्या पैशांच्या वादातून  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 04:33 IST

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांचे मारेकरी शोधण्यास तपास यंत्रणांना अद्याप यश आलेले नसतानाच सनातन संस्थेने ही हत्या पैशाच्या वादातून झाल्याचा संशय व्यक्त करुन तपासाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे.

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांचे मारेकरी शोधण्यास तपास यंत्रणांना अद्याप यश आलेले नसतानाच सनातन संस्थेने ही हत्या पैशाच्या वादातून झाल्याचा संशय व्यक्त करुन तपासाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे.पानसरे यांच्या नेतृत्वाखालील श्रमिक नागरी पतसंस्थेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नावे ४५ लाख ५१ हजार रुपयांची बेहिशेबी ठेवी आहेत. भाकपने या लाखो रुपयांचा तपशील निवडणूक आयोगालाही दिलेला नाही. त्यामुळे या पैशांतूनच पानसरे यांची हत्या झाल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्टÑचे समन्वयक मनोज खाड्ये, हिंदू विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.अ‍ॅड. इचलकरंजीकर म्हणाले, पानसरे यांच्या नेतृत्वाखालील श्रमिक पतसंस्थेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नावे ४५ लाख ५१ हजार ३५२ रुपयांची बेहिशेबी रक्कम ठेवली आहे. भाकपने या रकमेबाबत कोणताही तपशील निवडणूक आयोगाला दिलेला नाही. त्यामुळे या पैशांची सखोल चौकशी शासनाने अंमलबजावणी संचालनालय व सीबीआय यांच्याद्वारे करावी.हे सर्व आरोप फेटाळून लावत हत्येच्या तपासाची दिशा बदलण्यासाठी ‘सनातन’वाद्यांचा खटाटोप सुरू आहे, असे मेधा पानसरे यांनी पत्रकारांना सांगितले. कामगार संघटनेतून जमा झालेला निधी व विमानतळ परिसरातील पक्षाची विकलेली जागा यातून आलेला निधी हा श्रमिक पतसंस्थेत ठेव रूपाने ठेवल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला.पानसरे हे कामगार संघटनेचे काम पाहत होते, अनेक कामगार संघटनांचा निधी हा पक्षाच्या नावावर आलेला श्रमिक पतसंस्थेत ठेवरूपाने जमा केलेला आहे. सनातन व हिंदू जनजागृती संस्थेच्या नेत्यांनी केलेले आरोप हे पूर्णपणे निराधार व खोटे आहेत असेही त्या म्हणाल्या. 

टॅग्स :Murderखूनcrimeगुन्हे