शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

पानसरे हत्येचे गूढ उकलणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:51 IST

कोल्हापूर/मुंबई : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी परशुराम वाघमारेच्या चौकशीसाठी महाराष्टÑ ‘एसआयटी’चे विशेष पथक रविवारी रात्री बंगलोरला रवाना झाले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे हत्याप्रकरणी काही महत्त्वाचे धागेदोरे कर्नाटक ‘एसआयटी’च्या हाती लागले असल्याचे समजते. त्या अनुषंगाने हे पथक वाघमारेची चौकशी करणार आहे.बंगलोर येथे ५ सप्टेंबर २०१७ रोजी ...

कोल्हापूर/मुंबई : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी परशुराम वाघमारेच्या चौकशीसाठी महाराष्टÑ ‘एसआयटी’चे विशेष पथक रविवारी रात्री बंगलोरला रवाना झाले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे हत्याप्रकरणी काही महत्त्वाचे धागेदोरे कर्नाटक ‘एसआयटी’च्या हाती लागले असल्याचे समजते. त्या अनुषंगाने हे पथक वाघमारेची चौकशी करणार आहे.बंगलोर येथे ५ सप्टेंबर २०१७ रोजी गौरी लंकेश यांची गोळ्या घालून हत्या केल्याची कबुली मारेकरी परशुराम वाघमारे याने कर्नाटक एसआयटीला दिली आहे. लंकेश यांच्यासह डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि कॉम्रेड पानसरे या तिघांच्या हत्येसाठी एकच शस्त्र वापरल्याचा पोलिसांचा अंदाज होता. गुन्ह्यातील गोळ्यांच्या फॉरेन्सिक अहवालाने याला दुजोरा मिळाला होता. लंकेश यांच्या हत्येची कबुली देणारा संशयित मारेकरी कर्नाटक एसआयटीच्या हाती लागल्याने आता अन्य गुन्ह्यांचीही उकल होण्याची शक्यता बळावली आहे. त्यादृष्टीने तपास करण्यासाठी संशयित वाघमारेची चौकशी करण्यासाठी महाराष्टÑ एसआयटीचे पथक रविवारी रात्री बंगलोरला रवाना झाले.कर्नाटकातील लेखक डॉ. कलबुर्गी आणि ज्येष्ठ पत्रकार लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या पथकांशी आम्ही नियमित संपर्कात आहोत. तपासाच्या अनुषंगाने माहितीची देवाणघेवाण होत असते. कॉ. पानसरे आणि लंकेश यांच्या हत्येतील गोळ्यांचा फॉरेन्सिक अहवाल अद्याप महाराष्ट्र एसआयटीला मिळालेला नाही. कर्नाटकातील तपासावर आमचे लक्ष आहे. पानसरे हत्येत सहभाग असल्याचा एकही पुरावा मिळाल्यास वाघमारेला ताब्यात घेतले जाईल.ह्ण असे महाराष्टÑ एसआयटीप्रमुख संजय कुमार यांनी सांगितले.कोण आहे परशुराम वाघमारे?परशुराम अशोक वाघमारे हा विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी गावचा रहिवासी आहे. आईवडील दोघेही मजुरी करून घर चालवतात. नावाला त्याने बीएससी डिप्लोमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतला होता. पण हिंदुत्ववादी विचाराने तो कमालीचा प्रेरीत झाला होता. हिंदुत्वासाठी वाटेल ते करण्याची त्याची तयारी होती. त्यातूनच त्याने गौरी लंकेश यांची हत्या केली.श्रीराम सेना सरसावलीपत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी परशुराम वाघमारेसाठी श्रीराम सेनेनं फेसबुकवरून आर्थिक मदतीचं आवाहन केलं आहे. लंकेश यांच्या मारेकºयासाठी थेट हिंदुत्ववादी संघटनाच पुढे आल्याने अनेक तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत.