शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे हत्येचा कट कुरणेच्या बेळगावातील फार्महाऊसवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:35 IST

ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट संशयित भरत कुरणेच्या बेळगाव येथील फार्महाऊसवर रचला. हत्येनंतर पिस्तुलांसह मोटारसायकलींची विल्हेवाट लावण्यासाठी कोल्हापुरातील

ठळक मुद्देसूर्यवंशीसह कुरणेला आणखी आठ दिवसांची पोलीस कोठडी

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट संशयित भरत कुरणेच्या बेळगाव येथील फार्महाऊसवर रचला. हत्येनंतर पिस्तुलांसह मोटारसायकलींची विल्हेवाट लावण्यासाठी कोल्हापुरातील टेंबलाईवाडी मंदिर परिसरात बैठक झाली. यावेळी मास्टरमाइंड वीरेंद्र तावडे याच्यासह अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी, भरत कुरणे यांच्यासह अनोळखी चार व्यक्ती होत्या, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. शुक्रवारी सूर्यवंशी आणि कुरणे यांना न्यायाधीश एस. एस. राऊळ यांच्यासमोर हजर केले असता आणखी त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पानसरे हत्येप्रकरणी ‘एसआयटी’ने संशयित भारत ऊर्फ भरत जयवंत कुरणे (वय ३७, रा. धर्मवीर संभाजी गल्ली, बेळगाव) व वासुदेव भगवान सूर्यवंशी (२९, रा. करकी, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) यांना अटक केली आहे. त्यांच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शुक्रवारी पुन्हा न्यायालयात हजर केले. यावेळी विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद मांडला. टेंबलाईवाडी येथे झालेल्या बैठकीत तावडेने कुरणेकडे पिस्तूल दिले. त्याने ते बेळगावला नेऊन नष्ट केले; तर सूर्यवंशी याने मोटारसायकलींची विल्हेवाट लावल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संशयितांकडून पिस्तूल आणि दुचाकी हस्तगत करायच्या आहेत. त्यांची पोलीस कोठडी वाढवून मिळावी, अशी विनंती अ‍ॅड. राणे यांनी केली. त्यानुसार न्यायाधीश राऊळ यांनी दोघांना १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली.कामाची चर्चा नकोपानसरे हत्येनंतर संशयित अमोल काळे याने भरत कुरणे याला फोन करून बोलावून घेतले. ‘तू कोल्हापूरच्या कामाची मित्रांमध्ये सतत चर्चा करत असतोस, असे कानांवर आले आहे. याबाबत कोणाला काहीच बोलू नकोस; नाहीतर अडचणीत येशील,’ अशी समज कुरणेला दिल्याचे तपासात पुढे आले.

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेkolhapurकोल्हापूर