शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे हत्या प्रकरण : अमित डेगवेकरला न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 18:28 IST

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आठवा संशयित आरोपी अमित रामचंद्र डेगवेकरला सोमवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांनी ७ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला हजर केले होते. रात्री उशिरा त्याला बंगलोरला हलविण्यात आले.

ठळक मुद्देपानसरे हत्या प्रकरण : अमित डेगवेकरला न्यायालयीन कोठडीरात्री उशिरा बंगलोरला हलविले

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आठवा संशयित आरोपी अमित रामचंद्र डेगवेकरला सोमवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांनी ७ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला हजर केले होते. रात्री उशिरा त्याला बंगलोरला हलविण्यात आले.पानसरे हत्या प्रकरणात अमित डेगवेकर याने शस्त्र पुरवणे, पानसरेच्या हत्येच्या कटासंदर्भात बेळगावमध्ये बैठक झाली होती, त्या बैठकीला उपस्थित राहणे. बेळगाव परिसरात झालेले बॉम्बस्फोट प्रशिक्षण आणि गोळीबाराच्या वेळी प्रत्यक्ष सहभागी असल्याचा आरोप आहे. तसेच पानसरे यांच्या घराकडे जाणाऱ्या मार्गावर कोणत्या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत, त्याची रेकी करण्याचे काम त्याच्यावर होते.

१५ जानेवारीला त्याला बंगलोर येथून अटक केली होती. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तपास अधिकारी तिरूपती काकडे यांनी त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार केला होता. त्याच्या जबाबातून काही महत्त्वाचे पुरावे पथकाच्या हाती लागले आहेत.

तो पुरवणी अहवाल सोमवारी न्यायालयात सादर करण्यात आला. आतापर्यंत एसआयटीने केलेल्या तपासाचा पुरवणी अहवाल उच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे. हा संपूर्ण तपास गोपनीय असल्याने एसआयटीने तपासाची माहिती बाहेर पडू नये, याची दक्षता घेतली आहे.दुचाकीसह शस्त्रांचा पत्ताच नाहीपानसरे हत्येमध्ये वापरलेल्या दोन दुचाकी आणि दोन पिस्तुले यांचा अद्यापही ठावठिकाणा तपास पथकाच्या हाती लागलेला नाही. आतापर्यंत आठ आरोपींपैकी सहा आरोपींना अटक केली. त्यांच्या चौकशीमध्ये दुचाकीसह पिस्तुले कोठे लपविण्यात आली, याबाबत काहीच माहिती पथकाला मिळालेली नाही. पानसरे हत्येतील फरारी आरोपी विनय पवार, सारंग अकोळकर यांचा अद्यापही ठावठिकाणा मिळालेला नाही. 

 

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेkolhapurकोल्हापूरCourtन्यायालय