शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे हल्ल्यातील दुचाकी आंबोलीत ?

By admin | Updated: March 22, 2015 01:13 IST

कोल्हापूर, सिंधुदुर्ग पोलिसांचा कसून तपास

सावंतवाडी/कोल्हापूर : आंबोली येथे दोन दिवसांपूर्वी सापडलेल्या संशयास्पद मोटारसायकलीचा वापर हा ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येतील मारेकऱ्यांनी केला होता का, याचा तपास सध्या सिंधुदुर्ग व कोल्हापूर पोलीस करीत आहेत. या मोटारसायकलीची माहिती घेण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक आंबोली येथे येऊन घटनास्थळांची व दुचाकीची पाहणी करून परतले. याबाबतचा अहवाल ते पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांना देणार आहेत. त्यानंतरच या तपासाची सूत्रे हलणार आहेत. या मोटारसायकलीचा नंबर के ए २८ व्ही- ५०३१ असा आहे. ही मोटारसायकल कर्नाटकातील राजशेखर नामक व्यक्तीची असल्याचे निष्पन्न झाले आहे.ती आॅगस्ट २०१४ मध्ये चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी बेळगावातील पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत माहिती अशी की, कोल्हापूरची हद्द संपल्यानंतर अवघ्या चार किलोमीटरवर असलेल्या गडदूवाडी आंबोली येथे मुख्य रस्त्यापासून चार किलोमीटर अंतरावर मोटारसायकल बेवारस स्थितीत वनमजुरांना आढळून आली. या वनमजुराने आंबोली पोलिसांना या घटनेची कल्पना दिल्यानंतर पोलिसांनी घटना स्थळावरून ती ताब्यात घेतली. यावेळी या मोटारसायकलीस पुढे व मागे नंबरप्लेट नव्हती. पुढचा भागही फुटलेल्या अवस्थेत होता. मोटारसायकलीतील पेट्रोलही संपले होते. आंबोली पोलिसांनी या गाडीचा पंचनामा केला तसेच याची खबर सर्वत्र दिली होती. त्यानंतर शुक्रवारी दुपारी कोल्हापूर पोलिसांचे पथक स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोलीत दाखल झाले. त्यांनी गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांनी ही काळ््या रंगाची दुचाकी वापरली होती. आंबोलीत सापडलेली दुचाकी व मारेकऱ्यांनी वापरलेली दुचाकी यात साम्य वाटत असल्याने पोलिसांनी दुचाकीसह जागेची पाहणी केली. ही गाडी नेमकी कुठली याचा शोधही पोलिसांंनी घेतला. कर्नाटकमधील राजशेखर शेखदारस यांच्या मालकीची ती असल्याचे निष्पण्ण झाले. ही मोटारसायकल २७ आॅगस्ट २०१४ ला चोरीला गेल्याची तक्रार टिळकवाडी बेळगाव या पोलीस ठाण्यात दिली असल्याचे पोलीस तपासांत निष्पन्न झाले आहे. या दुचाकीच्या तपासाबाबतचा अहवाल कोल्हापूर पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांना देणार असून, त्यानंतर पुढील तपासाची सूत्रे हलविण्यात येणार आहेत. पुढील भाग तुटलेल्या अवस्थेत गोविंद पानसरे यांच्या हत्येसाठी मारेकऱ्यांनी जी दुचाकी वापरली होती, ती काळ्या रंगाची होती तसेच या दुचाकीला कोल्हापुरात वृत्तपत्र विक्रेत्याच्या सायकलची धडक लागली होती. यावेळी सायकलस्वार व मारेकऱ्यांमध्ये किरकोळ बाचाबाचीही झाली होती. त्यामुळे सायकलच्या धडकेनंतर दुचाकीचा पुढील भाग मोडू शकतो का, याचाही अभ्यास सुरू असून, सद्य:स्थितीत काहीअंशी या मोटारसायकलीचे पुरावे मिळते जुळते आहेत. ‘सीसीटीव्ही’वर तपास केंद्रित पोलिसांनी तपासाची दिशा आंबोलीतील सीसीटीव्हीवर केंद्रित केली आहे. ज्या दिवशी गोविंद पानसरे यांची हत्या झाली. त्या दिवसापासूनचे आंबोली पोलीस दूरक्षेत्रावरील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासासाठी घेणार आहेत. या मोटारसायकलीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत असून, या विषयावर अधिकृतपणे बोलण्यास कोणीही तयार नाही. सर्व काही वरिष्ठस्तरावर सुरू असल्याचे पोलीस सांगत आहेत. (प्रतिनिधी)